सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔷🔷🔷
राजिपचे निवृत्त शिक्षक रघुनाथ गणपत सुभेकर ( वय ८७) यांचे बुधवार दि. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता त्यांच्या नागोठण्यातील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व नागोठणे लायन्स क्लबचे खजिनदार एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांचे ते वडील होत. ११ नोव्हेंबर या त्यांच्या वाढदिवसीच त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कै. रघुनाथ सुभेकर यांचे मुळ गाव अलिबाग तालुक्याती रामराज हे आहे. कै. सुभेकर यांनी अनेक वर्ष नागोठणे विभागात आपली सेवा बजावली होती. सध्या ते त्यांचा मोठा मुलगा विवेक सुभेकर यांच्या निवासस्थानी राहत होते.
कै. रघुनाथ सुभेकर हे शिस्तप्रिय स्वभावाचे होते. त्यांनी आपल्या शिक्षिकी पेशातील जीवनात कोणत्याही प्रकारची तडजोड न केल्यामुळे त्यांना कायम डोंगर दऱ्या व गाव खेडयात नोकरी करावी लागली. कै. सुभेकर यांनी आपल्या आत्ता पर्यतच्या आयुष्यात समाजकार्य करण्यात खुप अनमोल योगदान दिले. सुतार पांचाळ समाजाचे रोहा येथे विश्वकर्मा मंदिर यांच्या अथक प्रयत्नातून उभे राहीले आहे.
अखेरच्या क्षणापर्यंत स्वतःचा भार दुसऱ्यावर पडू नये यासाठी सतत ते आग्रही होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली तसेच नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.








Be First to Comment