Press "Enter" to skip to content

गुरांना बेशुद्ध करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळा

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मागणी 🔶💠🔶

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🌟🔷

दिवसा भटक्या मोकाट गुरांवर पाळत ठेवून रात्री त्या गुरांना बेशुद्ध करून टेंपो भरून ती गुरं विक्रीस नेण्याचे प्रकार ग्रामीण भागात घडत असल्याने शेतकऱ्यांचा चिंतेचा विषय झाला आहे. ग्रामीण भागात मोकाट गुरं सोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आहे. अशी मोकाट गुरे रस्त्याच्या मधोमध रात्रंदिवस घोळक्याने विश्रांती घेत असतात.

वास्तविक शेतकऱ्यांनी आपली किमती गुरु अशी बेवारस न ठेवता किमान सायंकाळी आपल्या घरी वाड्यात बंद ठेवणे आवश्यक आहे. कारण आता भाताची मळणी झाली आहे. त्यानंतर भात दळण्यासाठी तसेच विक्रीसाठी नेण्यासाठी बैलगाडी आवश्यक असते. तसेच नांगरणी आणि शेतीचे काम करण्यासाठी बैलांची अत्यंत आवश्यक असते. तसेच दुधासाठी गाय, म्हशी अशी जनावर आर्थिक बाबी सांभाळून घेण्यासाठी मदत करतात. मात्र अशी जनावर सर्रासपणे मोकाट अवस्थेत रस्त्यावर विश्रांती घेत असतात.

दिवसा रात्री त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नसते. हाच फायदा गुर चोरणाऱ्या टोळ्या घेतात. मध्यरात्री मोकाट गुरं रस्त्यावर दिसली की त्यांना गुंगीचे इंजेक्शन मारून बेशुद्ध करतात त्यानंतर लगेच टेंपो मध्ये भरून सुसाट वेगाने विक्रीसाठी येतात. असे प्रकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घडत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कुडली ते विळा दरम्यान गुरं चोरणारी टोळी सक्रिय असल्याची वार्ता सर्वत्र पसरली होती. एक टेंपो भरून चोरट्यांनी पलायनही केले होते. मात्र या टोळीने अनेकांना गुंगारा देऊन सुरक्षितपणे पलायन केले.

त्यानंतर ही टोळी खोपोली कडे वळून तेथील गुरांना बेशुद्ध करून नेत होते मात्र चोरट्यांचा डाव धुळीला मिळवला. या गुरं चोरांची मुसकी लवकरच आवळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी जोर धरत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.