Press "Enter" to skip to content

पनवेल तालुक्यातील शिवथाळी भोजन केंद्राना मंजूरी द्यावी : भरत पाटील

सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । विकास पाटील । 🔷🔷🔷

महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या अनेक धडाडीच्या निर्णयात शिवथाळी योजनेचे सर्वसामान्य जनतेतून स्वगत होत आहे   सुरवातीला शासनाने ग्रामीण भागात ७५ ते १०० थाळी व शहरी भागात १२५ ते २०० पर्यत थाळी कोटा निश्चित केलेला होता .

सदर योजना कार्यन्वीत करण्यांसाठी अनेक इच्छूक उमेद्वार होते व त्यांनी शासनाकडे अर्ज केलेले आहेत.सध्या ते अर्ज शासन दरबारी योग्य त्या कारवाईसाठी प्रलंबित आहेत .तेव्हा त्या अर्जावर विचार करून ती लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी पनवेल शिवसेना संघटक भरत पाटील यांनी जिल्हापुरवठा अधिकारी  रायगड यांच्याकडे केली आहे. 

सर्वसामान्य गरीब जनतेचा विचार करताना त्याना स्वस्त व पोषक जेवन मिळावे म्हणून  महाआघाडी सरकाने शिवथाळी भोजन सुरू केले. 

महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्हयासाठी १०७ शिवथाळी केंद्राना १७,२०० भोजन थाळया मंजूर केलेल्या असून १३००० ते १४००० हजार विक्री होत असून कमीत कमी ३००० हजार भोजन थाळया यापूर्वी सुध्दा शिल्लक आहेत.सध्या शासनाने मंजूर शिवथाळी केंद्राना ५०० थाळयांचा कोटा कमी करून २०० भोजन थाळयांचा कोटा निश्चित करून दिलेला आहे तसेच जिल्हयातील १०७ शिवथाळी केंद्राना १७,३०० भोजन थाळया मंजूर केलेल्या असून सध्याच्या परिस्थितीत फक्त १०,०००  शिवभोजन थाळया विक्री होत आहेत.अशावेळी रायगड जिल्हयातील सरासरी ७,३०० शिवभोजन थाळयांचा कोटा शासन दरवारी पडून आहे आमच्या संघटनेचे म्हणणे असे की शासकीय नियमानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शिवथाळी केंद्राची मागणी करणारे श्री.सद्गुरू अनुराधा माउली बचत गट , मु.काळेंद्रे , ता.पनवेल व श्री ओंकार कॅटरर्स , कामोठे , ता पनवेल ( भोजनालय आणि टिफीन सर्विस ) यांचे व इतर अर्जदारांचे अर्ज प्रलंबित आहेत ते हातावेगळे करून शिल्लक राहिलेल्या शिवभोजन थाळयांच्या योजनेत त्यांना सामावून घेवून पनवेल तालुक्यातील प्रलंबित शिवथाळी केंद्राना मंजूरी देवून , योजनेचा लाभ देवून गोरगरीब जनतेला दिलासा मिळावा यासाठी पनवेल तालुक्यातील शिवभोजन थाळी केंद्राना मंजूरी देेण्यात यावी अशी मागणी  पनवेल शिवसेना संघटक भरत पाटील यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,, अन्न व नागरी  पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांना दिल्या आहेत.   

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.