आदिवासी समाजाचे मूलभूत प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : सौ.सुप्रिया उराडे 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶
आदिवासी महिलांचे हक्क व अधिकार राखण्यासाठी आदिवासी महिला परिषद महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष पदी जेष्ठ समाज सेवीका व आदिवासी नेत्या सौ.सुप्रिया यशवंत उराडे याची निवड झाली आहे. यानिवडीबाबत चे पत्र विनोद कुमरे समन्वयक आदिवासी महिला परिषद महाराष्ट्र राज्य यांनी उराडे यांना दिले.
सौ.सुप्रिया उराडे या सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे कार्यालय अधिक्षक म्हणून गेली 30 वर्षे आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक, वसतीगृहाच्या समस्या महाविद्यालयत येणारे आदिवासी विद्यार्थी,अपंग विद्यार्थी यांना शासनाकडून मिळणा-या विविध शिष्यवृत्ती योजना आदिवासी महिलांवर होणारे अत्याचार कृषीक्षेत्र आदि क्षेत्रात सातत्यपूर्ण उल्लेखनिय कार्य करीत आहेत .
जागतिक आदिवासी अधिवेशन 2020 पालघर येथे आयोजित अधिवेशनात यशस्वी सांस्कृतिक सुत्रसंचालन तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.८च्या चौपदरी व सहापदरी करण करताना मेंढवन येथील आदिवासींच्या भू संपादन आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे.
आदिवासी माणूस या देशाच्या विकास प्रक्रियतील शेवटचा घटक समजला जातो. आदिवासी समाजात स्त्रीयांची अवस्था यापेक्षा दयनीय आहे. एकूणच देशाचे विकास धोरणात आदिवासी स्त्री खूप मागे पडली आहे. शासकीय पातळीवर आदिवासी स्त्री विकाच्या धोरणाच्या अनुषंगाने अनेक उपक्रम राबवून ही ख-या अर्थाने आदिवासी स्त्रीयांपर्यंत विकासाच्या योजना पोचतं नाही. म्हणून आदिवासी महिलांसाठी विकास धोरण व आदिवासी महिलांच्या सुरक्षितेसाठी स्वातंत्र कायदा निमिर्तीच्या दृष्टीने विचार करून आदिवासी महिला परिषद महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आहे. आमचे प्रश्न आम्ही सोडवू खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांमध्ये सर्व सामान्य आदिवासी स्त्रीयांचा विकास आमचा केंद्रबिंदू आसेल.आदिवासी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयीन लढाई तसेच घटनेच्या चौकटीत राहून रस्त्यावरील लढाई लढून आदिवासी महिलांना समाजाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत .
सौ.सुप्रिया उराडे








Be First to Comment