आत्मनिर्भर दिवाळी महोत्सव २०२० नवं उद्योजकांच्या स्वदेशी वस्तु/ पदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔶🔶🔶
यावर्षीच्या दिवाळीत पनवेलचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी एक अभिनव उपक्रम राबविला आहे.
प्रभाग क्र.१८ मधील लघुउद्योजक-उद्योजिका, माता-भगिनी, युवा मित्र यांनी तयार केलेले स्वदेशी वस्तू व दिवाळी फराळ, यांचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे.
सध्या कारोना मुळे उद्योगधंदे आणि सामान्य चाकरमान्यांना झळ सोसावी लागत आहे आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि Vocal For Local यासंकल्पनेची घोषणा केली.
आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार आत्मनिर्भर प्रभाग- १८ दिवाळी महोत्सव २०२० हा उपक्रम राबवून प्रभागातील माता-भगिनी यांना आत्मनिर्भर होण्याच्या हेतुने तसेच पनवेलकरांना उत्तम प्रतीचे स्वदेशी वस्तू मिळाव्यात यासाठी हा विक्रांत पाटील यांचा प्रयत्न आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून उत्तम प्रतीच्या फराळ पदार्थ, पणत्या-कंदील, रोशणाई वस्तू, कपडे, सुगंधित साबण व उटणे, ड्रायफ्रूट गिफ्ट पॅक आणि इतर खाद्यपदार्थ व इन्स्टंट फुड रेडीमिक्स यांची खरेदी करता येईल. प्रभागातील नवं उद्योजकांना मोफत स्टॉल देऊन, नागरीक आणि लघुउद्योजक यांच्यातील समन्वय साधण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जेणेकरुन या दोघांनाही याचा फायदा होईल.
आपल्या नवं उद्योजक उद्योजिका यांना आत्मनिर्भर होण्यास प्रोत्साहन व वाव देण्या करीता आत्मनिर्भर प्रभाग-१८ दिवाळी महोत्सव २०२० ला जरुर भेट द्या असे आवाहन विक्रांत पाटील यांनी केले आहे.
ठिकाण : गोखले हॉल, पनवेल.
दिनांक १०/११/२०२० ते ११/११/२०२० वेळ : सकाळी १०.०० ते रात्री ०८.००








Be First to Comment