Press "Enter" to skip to content

शेतकरी भात खरेदी विक्रीच्या प्रतीक्षेत

रायगड जिल्ह्यात ३५ धानखरेदी केंद्रांना मंजूरी ! केंद्र कधी सुरू होणार ? 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । 🔷🔶🔷

आधी कोरोना मग चक्रीवादळ नंतर परतीच्या पावसाचा धुमाकूळ बसला शेतकऱ्यांच्या मानेवर परतीच्या पावसात भातशेतीचे अतोनात नुकसानीने बळीराजा झाला हतबल हातातोंडाशी आलेला मोत्याचा घास मातीला मिळाला तोंडावर आलेली दिवाळी कुटूंबाचे काढणार दिवाळे परतीच्या पावसातून थोडीफार वाचलेले पीक आज जीवाची बाजी लावत धानाचे दाणे दाणे जमा करतो यासाठी किती हमीभाव मिळेल ते दूर खाजगी दुकानदार कवडीमोल किंमतीत भात खरेदी विक्री करतात मात्र शासनाचे केंद्र आजवर सुरू होत नाहीत कधी केंद्र सुरू होणार या कडे बळीराजा डोळे लावून बसला आहे.

आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत मार्केटींग फेडरेशन, मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था, जिल्हा मार्केटींग रायगड यांच्यामार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम २०२०-२१ मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा या तालुक्यांसह जिल्ह्यात एकूण ३५ धानखरेदी केंद्रांवर खरेदी करण्यासाठी मंजुरी देखील मिळाली आहे तरी देखील भात खरेदी विक्री केंद्र सुरू करण्यास विलंब का ?

बळीराजा भात खरेदी विक्रीच्या प्रतीक्षेत असून त्याचे डोळे शासनाच्या खरेदी विक्री केंद्राकडे वेधले आहेत भात खरेदी विक्री केंद्र कधी सुरू होणार याची चिंता लागली असून शासनाचा हमीभाव मिळेल यासाठी बळीराजाचे भिर भिर डोळे खरेदी विक्री केंद्राकडे लागले असल्याचे दिसून येत आहे ,

रोहा तालुक्यात भातशेती नुकसानीचे ताबडतोब पंचनामे केले गेले याला महिना उलटून गेला त्या पचनाम्यांचे काय झाले याचा उलगडा देखील होत नाही नुकसानभरपाई मिळेल की नाही की सबंधित अधिकारी वर्गाने व शासनाच्या नियमाने बळीराजाला धीर मिळावा यासाठी हे पंचनामे केले गेले का असा सवाल शेतकरी वर्गात उठला आहे चक्रीवादलातील पंचनामे केले काहींना नुकसानभरपाई मिळाली तर काही अद्याप प्रतीक्षेत आहेत जो संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो जो सर्वाना धान पुरवून पोटाची भूक भागवतो त्याच्यावरच आज उपासमारीची वेळ आली आहे .

मागील सहा महिने कोरोनाचा संकट पुढे दिवाळी म्हणून पाऊस थांबताच क्षणाचाही विलंब न लावता बळीराजाने नुकसानीतून वाचलेले पीक कापून बांधून झोडून हाती आलेले धान जमा केले मात्र त्याला बाहेर पुरेसा हमीभाव मिळत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे त्यामुळे शासनाने मंजुरी दिलेल्या ठिकाणी ताबडतोब भात खरेदी विक्री केंद्र सुरू करावेत अशी मागणी रोहा तालुक्यातील असंख्य शेतकरी वर्गातून केली जात आहे ,

One Comment

  1. izle izle January 17, 2021

    Your favorite justificationreason appeared to beseemed to be on the internetnetweb the simplesteasiest thing to be aware of. Loree Hube Saraiya

Leave a Reply to izle Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.