


पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी ( फेब्रु/ मार्च २०२६ ) बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल ९८.५५ टक्के लागला आहे. कला ,वाणिज्य व विज्ञान शाखेतून बोर्ड परीक्षेस एकूण १२४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातून १२३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेचा निकाल ९७.६४ टक्के लागला असून कला शाखेतून ८५ विद्यार्थी बोर्ड परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यातून ८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतून दिशा नानाजी बोरसे ही विद्यार्थिनी ७९.५० टक्के गुण मिळवून प्रथम, सृष्टी संतोष महाडिक ही विद्यार्थिनी ७७.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर विशेष म्हणजे रोशनी जगदीशभाई कुमावत या दृष्टीहीन विद्यार्थिनीने ७७.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९७.०२ टक्के लागला असून वाणिज्य शाखेतून ४०४ विद्यार्थी बोर्ड परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यातून ३९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतून श्रावणी निलेश गावंड ही विद्यार्थिनी ८८.५० टक्के गुण मिळवून प्रथम , सचिनकुमार बसंतलाल कुशवाहा हा विद्यार्थी ८८.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर आर्या राकेश खंडागळे या विद्यार्थिनीने ८६.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल ९९.४७ टक्के लागला असून विज्ञान शाखेतून ७५९ विद्यार्थी बोर्ड परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यातून ७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . विज्ञान शाखेतून हंसिका जितेश कलाल ही विद्यार्थीनी ८५.५० टक्के गुण मिळवून प्रथम , निखिल मंटूप्रसाद गुप्ता हा विद्यार्थी ८५.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर शुभम संतोष सडेकर या विद्यार्थ्याने ८५.०० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. एच एस सी बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस टी गडदे, प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, पर्यवेक्षिका स्वाती पाटील, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी गुणवंतांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Be First to Comment