Press "Enter" to skip to content

लेखनिक अनिल ठाकूर सन्मानाने सेवानिवृत्त


खांब,दि.२(नंदकुमार मरवडे)

कोएसो डॉ.सी.डी.देशमुख महाविद्यालय रोहाचे मुख्य लेखनिक अनिल हरिभाऊ ठाकूर नियत वयोमानानुसार आपल्या सेवेतून ता.३० एप्रिल रोजी सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत.

अनिल ठाकूर यांना कोएसोचे चेअरमन अॅड सिद्धार्थ संजय पाटील,सदस्य संजय दत्ता पाटील,सदस्य लिलाधर लक्ष्मण थोरवे व लोकनेते दत्ता पाटील यांनी कोकण एज्युकेशन सोसायटी नोकरी करण्याची संधी मिळवून दिली.तर अनिल ठाकूर यांनी आपल्या सेवा काळात अतिशय प्रामाणिक व निष्ठेने आपला कार्यकाळ पूर्ण करून मोठ्या सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांना सन्मानित करून शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी सदस्य हेमंत गांगल,प्रा.डाॅ.अतूल साळुंखे, शंकरराव म्हसकर व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.तसेच कोकण विभाग प्रशासन अधिकारी पनवेल योगेश आहिर, सहा.लेखाधिकारी कोंकण विभाग पनवेल रिद्धी जंजिरकर,कनिष्ठ प्रशासन अधिकारी कोकण विभाग पनवेल संभाजी साबळे,कनिष्ठ लिपिक कोकण विभाग पनवेल किरण पाकळे,अजित शिंदे, कुणबी समाज मुंबई विभागाचे पदाधिकारी व अनिल ठाकूर यांचे बंधू सुनील ठाकूर आदींसह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.