सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । विकास पाटील । 🔷🔶🔷
कोरोना महामारीत लाँकडाऊन घोषित केल्याने संपूर्ण उद्योग धंदे व्यापारसह वाहतुक सेवाही बंद त्यामुळे वाहतुकदारांसह वाहक चालक, क्लिनर लोकांचे हाल झाले. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यसमोर उभा आहे तर वाहतुक व्यावसायिक कर्जाचा डोंगर घेवून जगत आहेत. आताच व्यवसाय चालू होवून तग धरत आहेत तेव्हा वाहतुकीच्या नियमात काही महिने शिथिलता असावी अशी विनंती रायगड जिल्हा शिवसेना वाहतुक सेनेचे अध्यक्ष महेश गुरव यांनी राज्य प्रादेशिक परिवहन विभाग ( आर टीओ) पनवेलला केली आहे.
कोरोनाने संपुर्ण जगात दहशत माजविली आहे. कोरोनाच्या जैविक विषाणूवर मात करण्यासाठी देशासह राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. तर कोरोना महामारी पासून सुरक्षित म्हणून सर्वानी आपल्याला घरात बंद केले संपूर्ण उद्योग व्यवसाय ठप्प होवून वाहतुक व्यवसाय बंद करण्यात आला होता. शासनाच्या या निर्णयाचा स्वागत केले म्हणून कोरोनावर आपण मात करू शकलो पण या लाँकडाऊन मध्ये कारखाने बंद होवून अनेकांच्या नोक-या गेल्या. अनेक व्यवसाय बंद झाले तर वाहतुक व्यवसाय पुर्णपणे बंद असल्याने वाहतुकदार कर्जाऩे बुडाला त्याचे दिवाळे निघाले. कर्जाच्या बोजाखाली गेलेला वाहतुक व्यावसायिक चालक व क्लिनरना वेतन देणे शक्य नसतानाही त्यांच्या परिवारावर उपासमारी येवू नये म्हणून कमी जास्त प्रमाणात वेतन देत त्यांना कोरोनाच्या महामारीत जगण़्याची हिंमत देत राहिले. पण या लाँकडाऊनमध्ये काहीचे दिवाळे निघाल्याने अनेक वाहन चालकांना घरी बसावे लागले.
आता देशासह राज्यात सात महिन्यानंतर अनलाँक सुरू करण्यात आले. तेव्हा हलुहलू जनजीवन पूर्वपदावर येत आहे तेव्हा उद्योग, व्यावसायाना चालना मिळत आहे. वाहतूक व्यावसायाला उभारी मिळावी तो जगला जावा यासाठी काही महिने वाहतुकीच़्या नियमात शिथिलता देण्यात यावी अशी विनंती रायगड जिल्हा वाहतुक सेनेचे अध्यक्ष महेश गुरव यानी पमवेल राज्य वाहतूक परिवहन विभागला ( आरटीओ ).केली आहे.








Be First to Comment