सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । 🔷🔷🔷
शाळकरी मुलांच्या शाळा कोरोनामुळे बंद आहेत .तसेच शिक्षण ऑनलाइन सुरू आहे .लॉकडाऊन टाळेबंदी च्या काळात सामाजिक परिस्थितीमुळे मागास भागातील मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित राहतोय व अभ्यासात मागे पडतोय तरी सामाजिक बांधिलकी म्हणून सौजन्य फाउंडेशन ही संस्था हा फरक भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.रसायनी पाताळगंगा विभागातील वाशिवली गावात दोन महिन्यापासून हा उपक्रम सुरू आहे.
या उपक्रमाला वाशिवली गाव व आसपासच्या परिसरातील मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सौजन्य फाउंडेशनने आपल्या दुसऱ्या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात वडगाव या गावात आजपासून सुरू केली आहे.यावेली पहिली ते सातवी वर्गातील मुलांची उपस्थिती होती.पाताळगंगा परिसरात यावर यापूर्वी महिलांच्या आरोग्यासाठी या संस्थेने उपक्रम राबविले आहेत.सदर उपक्रम मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविला जाणार आहे .आदिवासी -कातकऱ्यांच्या दुर्गम भागातही या संस्थेचा शैक्षणिक उपक्रम घेऊन जाण्याचा मानस आहे.
ग्रुप ग्रामपंचायत वडगावमधील हनुमान मंदिर येथे सौजन्य फाउंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात झाली असून. यावेळी सरपंच गौरी माधव गडगे , माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य महादेव कमलाकर गडगे,संतोष दत्तात्रेय गडगे (पंचायत समिती विभाग प्रमुख),मर्कंच्या स्वाती जाधव,माजी सदस्य भीम हिरु गाथाडे, सदस्य सरिता संतोष गडगे, सदस्य कल्पना मदन ठोंबरे, सदस्य चंद्रकला परशुराम कातकरी, योगेश हनुमंत पाटील,गणेश असो पोपेटे,विष्णू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment