अष्टमी येथील हनिफ दर्जी यांनी रस्त्यात सापडलेले सव्वा लाख रुपये केले परत 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित झाल्यापासून सर्वत्र सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यातच नैसर्गिक आपत्ती आणि वाढत्या महागाईमुळे जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाला रस्त्यात अनावधानाने एखादी बक्कल रक्कम मिळाली तर ‘सोन्याहून पिवळ’ होय अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र अष्टमी मुस्लिम समाजाचे खजिनदार सामाजिक कार्यकर्ते हनिफ दर्जी यांनी त्यानं नाक्यावर भर रस्त्यात मिळालेली जवळपास सव्वा लाख रुपयांची रोखड संबधीत मालकाला इमान इतबारे परत करत लाख मोलाची माणुसकी दाखविली.
हनिफ दर्जी यांच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. रोहे अष्टमी येथील एक चिकन विक्रेता तरुण आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून सकाळी 10 :30 च्या सुमारास बॅंकेत भरणा भरण्यासाठी मोटारसायकल वरून जात असताना त्याच्या खिशातील पैसे भरलेली पिशवी अष्टमी नाक्या जवळ पडली. सदर पैशाने भरलेली पिशवी या दरम्यान अष्टमी मुस्लिम समाजाचे खजिनदार श्री. हनिफ दर्जी हे याच रस्त्यावरून मार्गक्रम करीत असताना त्यांच्या निदर्शनास आली.
दर्जी यांनी सदर घटना गावातील दोन इस्माना सांगितली. काही वेळात या मार्गावर सदर चिकन विक्रेता हरवलेली पैशांची पिशवी शोधत असल्याचे दृष्य श्री. हनिफ दर्जी व अन्य दोन इस्मानी बघितले. व विचारपूस केली. सदर तरुणाने हरवलेल्या पिशवी व 1 लाख 20 हजार रक्कम विषयी व्यवस्थित माहिती दिली. दिलेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर दर्जी यांनी दोन साक्षीदार यांच्या साक्षीत सदर रक्कम त्या तरुणाला परत दिली.
काही काळ भेदरलेल्या तरुणाला आपल्या हक्काची रक्कम परत मिळाल्याने त्याने दर्जी यांचे आभार मानले.तर दुसरी कडे दर्जी यांच्या इमानदारी बद्दल त्यांचे कौतुक होत आहे. अर्थातच प्रामाणिकपणा दुर्मिळ झालेला असला तरी हनिफ दर्जी यांच्या सारखे प्रामाणिक माणसं अद्याप आहेत असच काहीसं या घटनेवरून म्हणावे लागेल.







Be First to Comment