Press "Enter" to skip to content

आंदोलनकर्ते अनंत भुरे यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

खार गांधे सह 10 गावांच्या  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गेलं इंडिया कंपनीकडून मिळणार नुकसान भरपाई 🔷🔶🔷

रायगड जिल्हाधिकाऱ्यांची यशस्वी मध्यस्ती 🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । 🔷🔷🔷

सन २००८ मध्ये गेलं इंडिया कंपनी कडून चुकीच्या कामाच्या पद्धतीमूळे तालुक्यातील खार गांधे , चोळे , अटिवली , मुंढाणी , जांभुळटेप , तरशेत , शेतजुई . झोतिरपाडा , बेणसे , कोलेटी , व पालखार असे एकूण ११ गावांच्या शेतीचे पूर्ण पणे नुकसान झाले. गेलं कंपनी कडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी संविधानिक मार्गाने लढा उभारला. मात्र गेलं कंपनी प्रशासन व शासनदरबारी या कामी विलंब होत असल्याने  संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक पावित्रा घेतला. 

शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी अनंत देविदास भुरे यांनी दिलेल्या आमरण उपोषण इशाऱ्याची प्रशासनस्थरावर तात्काळ दखल घेण्यात आली.  व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या दालनात, गेलं प्रशासन व शेतकऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत कंपनीने दीड महिन्यात नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. त्यामुळे आंदोलनकर्ते अनंत भुरे यांनी 9 नोव्हेंबर 2020 रोजी होणारे आमरण उपोषण तूर्तास स्थगित केले.

रायगड जिल्हाधिकारी यांनी बाधीत शेतकऱ्यांची व्यथा  जाणून घेत सर्व  कागदपत्रांची पाहणी करून त्यांनी केलेली मागणी रास्त असल्याचे स्पष्ट करीत शासनाच्या निर्णयाचे अनुपालन करून शेतकऱ्यांना जलद  नुकसान भरपाई देणेबाबत गेलं कंपनीला सूचित केले. त्यानुसार गेलं कंपनीचे उपाध्यक्ष निलेश देसाई व गेलं सक्षम प्राधिकारी अश्विनी पाटील यांनी दोन महिन्यांच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वाशीत केले. जिल्हाधिकारी यांच्या यशस्वी मध्यस्तीने आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळणार असल्याचे सांगत शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी  निधी चौधरी यांचे आभार मानण्यात आले. 

या बैठकीस शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे, के.के.कुथें, सुरेश कोकाटे ,जनार्दन घासे, जानू कुथें, दत्तात्रेय कुथें, भानुदास भुरे, र य पाटील गुरुजी, नारायण म्हात्रे, देविदास भुरे तसेच प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार अरुणा जाधव, म.औ. प्रादेशिक अधिकारी श्री रोकडे, खारलँड उपअभियंता श्रीमती गायकवाड, गेलं कंपनी उपाध्यक्ष निलेश देसाई, गेलं सक्षम प्राधिकारी अश्विनी पाटील आदी उपस्थित होते. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.