सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे । 🔷🔶🔷
रोहा तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे तारेघर गावच्या रहिवासी वंदना (लीला)महादेव मातेरे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६७ व्यां वर्षी राहत्या घरी दुःखद निधन झाले.
रायगड जिल्हा भोई समाजाचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल महादेव मातेरे यांच्या त्या मातोश्री होत. त्या अतिशय प्रेमळ,परोपकारी व मनमिळाऊ,स्वाध्याय परिवाराचे अनुयायी होत्या अध्यात्मिक व धार्मिक वृत्तीच्या सरळ साध्या स्वभावाने सर्वांनाच सुपरिचित होत्या.आज त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या अंत यात्रेला रोहा ग्रामीण विभागसह चणेरा – खारगाव खारी पंचक्रोशी विभागतील कुणबी,कोळी, आदिवासी,भोई समाज बांधव,राजकीय, सामाजिक,तसेच शैक्षणिक,विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सध्या कोरोना- १९ चे प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग च्या नियमांचे पालन करीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे,एक मुलगी,सूना,जावई,पुतणे,नातवंडे,पतवांडे असा मोठा परिवार आहे..







Be First to Comment