सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
पनवेल महानगर पालिका स्थापन झाल्यापासुन जवळजवळ १००० सफाई कामगार हे विविध विभागांत काम करत आहेत. कचऱ्याच्या गाडीवर काम करणारे वाहक व कामगार हे मागील काही दिवसांपासुन त्यांना न मिळणाऱ्या सुविधांचा पाठपुरवा कंत्राटदाराकडे करत होते परंतू कंत्राटदाराने वेळकाढू धोरण अवलंबले आहे. कामगार नेते महेंद्र घरत हेच आपल्याला न्याय देवू शकतात असा विश्वास कामगारांना वाटल्यामुळे सफाई कामगारांनी न्यु मॅरीटाईम ॲन्ड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्विकारले आहे.
संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संघटनेचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. कामगारांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू तसेच पगार व इतर सुविधा मिळणे हा तर कामगारांचा अधिकार आहे. परंतू कामगारांना कायम स्वरूपी काम मिळाले पाहीजे असे महेंद्र घरत यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितिले.
या नामफलक अनावरण प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, संजय ठाकूर, परशुराम भोईर, मुरलीधर ठाकूर, प.ता. इंटक अध्यक्ष दिपक ठाकूर, माजी नगरसेविका शाशिकला सिंग, प.विधानसभा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, उ.ता.युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, संघटक आनंद ठाकूर, विश्वनाथ गडगे, रमेश पोरजी विजय दाभणे, राजेश काठावले, लहू माने, राहुल जानोरकर, अरूण म्हात्रे, आदीत्य घरत, योगेश रसाळ, प्रभाकर पाटील व पनवेल महानगर पालिकेचे सफाई कामगार मोठया संख्येने उपस्थीत होते.







Be First to Comment