कंत्राटी सुरक्षारक्षक कामगारांचे शिष्टमंडळ शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या भेटीला 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔶🔷🔶
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तळोजा फिडर येथील कंत्राटी सुरक्षारक्षक कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन आज शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी आलेल्या कंत्राटी सुरक्षारक्षक कामगारांच्या शिष्टमंडळाला दिली.
कंत्राटी सुरक्षारक्षक कामगारांच्या वतीने माणजी काठे, हरिश्चंद्र म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील आदींसह इतर कामगार सदस्यांनी आज प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष व शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांची भेट घेतली. मौजे नागझरी, खोणी, न्हानेर, चिरड, उसाटणे या परिसरातील अनेक जण कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तळोजा फिडर येथे कंत्राटी सुरक्षारक्षक कामगार म्हणून काम करीत आहेत.
या कामगारांना आता शासनाने कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी बबनदादा पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा याबाबतचे निवेदन दिले असता सर्व कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन आज शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनीकंत्राटी सुरक्षारक्षक कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले.








Be First to Comment