Press "Enter" to skip to content

बुधवार १५ जुलै २०२०

आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल

🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : आषाढ
🌓पक्ष तिथी : कृष्ण दशमी
🌝माह (अमावास्यांत): आषाढ
🌝माह (पौर्णीमांत) : श्रावण
🌸नक्षत्र : भरणी
🌳ऋतु : ग्रिष्म
🌳सौर ऋतु : वर्षा
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:०७:४२
🌕सुर्यास्त: १९:१३:२३
🌤️दिनकाल: १३:०५:४१
🌺वारः : बुधवार
🌞 राष्ट्रीय सौर आषाढ २४
🌻१५ जुलै २०२०
📺 दिनविषेश
🚩मुंबई मध्ये कुलाबा-क्राॅफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा प्रारंभ १९२६
🚩रघूनाथ धोंडो कर्वे यांचा समाज व्यवस्था ह्या मासीकाचा का पहिला अंक प्रकाशीत १९२७
🚩पुणे येथे ज्ञानप्रबोधीनी संस्था प्रारंभ १९६२
🚩श्री पांडूरंगशास्त्री आठवलेजी यांना रॅमन मेगसेसे पुरस्कार घोषीत १९९६
🚩पर्यावरणवादी श्री महेशचंद्र मेहताजी यांना रॅमन मेगसेसे पुरस्कार घोषीत १९९७
💐 जन्म तिथी 💐
🚩जयपूरचे राजा श्री मिर्झाराजे जयसींग १६११
🚩जयपूर-अत्रौली घराण्यातील शास्त्रीय गायीका गानतपस्वीनी श्रीमति मोगूबाई कुर्डीकर १९०४
🚩विचारी, डाॅ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा श्री शिवाजीराव भोसले १९२७
🚩विद्वान,लेखक, आलोचक श्री नरहर कुरूंदकर १९३२
🚩लेखक, पटकथाकार श्री एम टी वासुदेवन् नायर १९३३
🚩दलीत साहित्यिक श्री माधव कोंडवलकर १९४९
🌷 स्मृति दिन 🌷
🚩मराठी नाट्य गायक, अभिनेता श्री नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व १९६७
🚩गोवामूक्तीसंग्रामाचे स्वतंत्रता सेनानी कर्नाटकसिंह श्री जगन्नाथराव जोशी १९९१
🚩स्वतंत्रता सेनानी श्री ताराचंद परमार १९९८
🚩पर्यावरणवादी लेखक श्री जगदीश गोडबोले १९९९
🚩सामाजीक कार्यकर्ता श्रीमती इंदूताई टिळक १९९९
🚩कुटूंब नियोजनाच्या क्षेत्रातील सलग साठ वर्ष पर्यत कार्य करणारे पद्मभूषण डाॅ बानू जहांगीर कोयाजी २००४

🌞 आज चे राशिफल 🌞
बुधवार १५/०७/२०२०

🕉 राशी फल मेष
“आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. शांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.”

🕉 *राशी फल वृषभ*

“आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल. काम व इच्छित योजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा. घरातील वातावरण आनंददायी राहील.

🕉 *राशी फल मिथुन*

“आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या. “

🕉 *राशी फल कर्क*

“आर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्मसंयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल. ”

🕉 *राशी फल सिंह*

“आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा. ”

🕉 *राशी फल कन्या*

“बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा. सुख-शांतीचे वातावरण राहील. हसत खेळत वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल. ”

🕉 *राशी फल तूळ*

“व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. आज आपल्या आयुष्यात आपल्या नातलागांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शक्य आहे. “

🕉 राशी फल वृश्चिक
“नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. “

🕉 राशी फल धनु
“आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोण प्रदर्शित करा. आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील चांगली बातमी आणणारा आहे.प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. “

🕉 राशी फल मकर
“आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील.”

🕉 राशी फल कुंभ
“मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात. “

🕉 राशी फल मीन
“आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. कुटुंबाबरोबर आज घालवलेले आनंददायी क्षण आयुष्यभर स्मरणात रहातील. “

जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात,

मनाच्या इवल्याशा कोपर्‍यात
काही गोड माणसं हक्काने राज्य करतात , यालाच तर ऋणानुबंद्ध म्हणतात …..

️🙏 सं.अजय शिवकर 🙏

*||शुभं भवतु ||*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.