सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔷🔶🔷
सामाजिक विकास मंडळ व देवी आंबा माता चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२०, वर्ष नवरात्रोत्सव निमित्ताने खांदा कॉलनी विभागातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीबांना दिलासा देताना सॅनिटायझर बॉटल, व मास चे मोफत वाटप करण्यात आले
नगरसेविका कुसूम पाटील व माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी कोरोनाच्या महामारीत जनतेला दिलासा देणारे विविध कार्यक्रम राबविले व राबवित आहेत. यात त्यांनी जीवनावश्यक वस्तू पासून सँनेटाझर, मास्क, पाण्याची बाटळी, बिस्केट पासून नाश्ताचीही व्यवस्था केली होती. नवरात्रीउत्सवा निमित्त आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देताना सँनेटाझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ, कुसुम पाटील ( नगरसेविका पनवेल महानगरपालिका ) सौ, अस्मिता म्हात्रे, सौ, सुवर्णा भोसले, सौ, नयना मोहिले, सौ, सुनीता गुरव, सौ. नीलम पाटणे, सौ. उज्वला रेणके, अफसना शेख, या महिला कार्यकर्त्यानी मेहनत घेतली.








Be First to Comment