बॉलीवूड चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणावर फाईट सीन्स असतात. बहुतेक त्यामूळेच हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर खुप चांगली कमाई करतात. पण चित्रपटांसारखा ऍक्शन सीन जर खऱ्या आयुष्यात बॉलीवूच्या सर्वात मोठ्या ऍक्शन हिरोसोबत घडला तर मग कसे वाटेल?
हा किस्सा बॉलीवूड अभिनेता अजय देवगनसोबत घडला होता. अजय देवगनने ऍक्शन हिरो म्हणून बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. त्याच्या पहिल्याच चित्रपटात त्याने अनेक प्रकारचे स्टन्ट केले होते. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्याला हा सीन करता आला नाही.
हा किस्सा आहे ९० च्या दशकातील. अजय देवगनने बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. त्याला चांगले यश देखील मिळत होते. तो त्याचे यश बघून खुप आनंदी होता. त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. खुप कमी वेळात तो बॉलीवूडचा सुपरस्टार झाला होता.
अजय देवगन मुंबईच्या बाहेर त्याच्या एका चित्रपटाचे शुटिंग करत होता. त्याच्या चित्रपटाच्या सेटवर त्यांचे काही मित्र त्याला भेटायला आले होते. थोड्या गप्पा मारल्यानंतर त्यांनी बाहेर फिरायला जायचा निर्णय घेतला.
अजयकडे त्यावेळी एक पांढऱ्या कलरची जीप होती. ते सर्वजण ती जीप घेऊन बाहेर फिरायला निघाले. अजय गाडी चालवत होता. ते अनेक ठिकाणी फिरले. शेवटी ट्राफिकपासून वाचण्यासाठी त्यांनी गाडी तिथे असणाऱ्या छोट्या गल्लीतून नेण्याचा निर्णय घेतला.
एका ठिकाणी त्यांच्या गाडीसमोर अचानक एक लहान मुलगा आला. वेळेतच अजयने गाडीला ब्रेक मारला आणि मोठी दुर्घटना टळली. सर्वांनी गाडीतून उतरून त्या मुलाला बघितले. त्याला काहीही झाले नव्हते.
पण त्या घटनेनंतर तिथल्या लोकांनी मात्र अजयला आणि त्याच्या मित्रांना पकडले. एक दोन म्हणता म्हणता ५०० ते ६०० लोक तिथे जमा झाले. त्यांनी ओरडायला सुरुवात केली. लोक काहीच ऐकायला तयार नव्हते.
लोकांनी अजयला वाईट बोलायला सुरुवात केली. मोठी माणसे असच वागतात. त्यांना दुसऱ्यांच्या जीवाची पर्वा नसते वगैरे वगैरे… त्याच्या मित्रांनी त्या लोकांना समजवायचा प्रयत्न केला. पण ते ऐकत नव्हते. हे सगळे पाहून अजय घाबरला. त्याच्या डोळ्यात पाणी आले.
या गोष्टीबद्दल अजय देवगनच्या वडिलांना समजले. ते बॉलीवूडमधले खुप मोठे ऍक्शन दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये फाईट सीन्सचे दिग्दर्शन केले होते. त्यांना जेव्हा समजले की त्यांचा मुलगा अडचणीत आहे. त्यांनी लगेच त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला.
विरु देवगन घटनेच्या जागी पोहोचले. पण ते एकटे गेले नाहीत. ते सोबत २०० बॉडी बिल्डर्स घेऊन गेले. तिथे लोकांनी अजयला पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची तयारी केली होती. पण अजयच्या वडिलांनी तिथली सगळी परिस्थिती सांभाळली आणि अजयला त्या लोकांपासून वाचवले.
या घटनेबद्दल अजय देवगनने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. तो म्हणाला होता की, ‘मला मित्रांसोबत फिरायला जाणे खुप महागात पडले होते. पण त्या घटनेनंतर मी परत कधीच आयुष्यात शॉर्टकट घेतला नाही. मी फक्त माझ्या वडिलांमूळे वाचलो. नाही तर मी आज तुरुंगात असतो’.
Be First to Comment