सिटी बेल लाइव्ह । नवरात्र विशेष । धनाजी घरत । 🔶🔷🔶
केळीच्या झाडातून प्रकट झालेली नवसाला पावणारी पेण तालुक्यातील खरोशी येथील श्री केळंबादेवी मंदिर हे रायगडसह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान स्फूर्तीस्थान आणि सुखस्थान आहे.या माऊलीचा नवराञ उत्सव १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर असा साजरा होत आहे .
प्रतिवर्षाप्रमाणे सर्वञ नवराञोत्सव साजरा होत आहे.घटस्थापनेनंतर नऊ दिवस देवीसमोर भक्तगण जागरण करून आपले गा-हाणे मांडतात.
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध दशमी या कालावधीत साजरा होणारा नवराञोत्सव लहान थोर सर्वांचे आकर्षण ठरले आहे.अनेक भक्तगण या नऊ दिवसात जागृत असणा-या देवीच्या दर्शनाला जात असतात.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खरोशी या ठिकाणी डोंगर द-यांच्या कुशीत सर्वपरिचित अशी स्वयंभू शाश्वत आणि सदैव जागृत असणारी श्री केळंबादेवी भक्तांचे श्रद्धास्थान आहे.फार फार वर्षापूर्वी इथे डोंगर माथ्यावर ॠषींचे वास्तव्य होते.बाळगंगा नदीच्या काठावरून या पवित्र ठिकाणी जाताना रस्त्याच्या दुतर्फा अनेक झाडे आहेत.देवीच्या दर्शनाला जाताना निसर्गाचा अविष्कार असलेला हिरवागार रम्य परिसर पाहून मनाला एक प्रकारची शांती लाभते.मंदिराच्या परिसरात बेल वृक्षाचा रान पसरलेले आहे.
त्याचप्रमाणे केळी चाफा रामवृक्ष कणेरी करंडोफ यासारख्या फुलझाडांनी परिसर फुलून गेला आहे.अशा निसर्गरम्य आणि शेकडो फुट उंचावर माऊलीचे वास्तव्य आहे.
देवाची अख्यायिका
खरोशी गावाच्या सरहद्दिला लागून घनदाट जंगल आहे. एके दिवशी गावातील एक गृहस्थ सदर ठिकाणी शुभकार्यासाठी केळीची पाने आणावयास गेला होता. त्याने पाने तोड़ण्याऐवजी संपूर्ण केळीच झाडच तोडण्यास सुरुवात केली. एवढ़यात त्या झाडातुन रक्तप्रवाह होऊ लागले. त्या ठिकाणी एक पाषाण होते. केळीतुन निघणाऱ्या रक्तामुळे त्या पाषाणाचा आकार वाढला. हा प्रकार पाहून तो गृहस्थ घाबरला व त्याने सदर माहिती गावक-यांना र्सांगितले. ते द्रुश्य पाहून गावकरीही आश्चय चकित झाले.त्यांनी हा सारा प्रकार निष्णात ज्योतिष्यांना सांगितला. ज्योतिष्यांनी सांगितले की. त्या पवित्र ठिकाणी आदिशक्तिचे स्थान आहे ते म्हणजेच आमची स्वयंभू , शाश्वत आणि सदैव जागृत असणारी श्री केळबादेवी…….
श्री शिवाच स्थान
इ.स. १६०८ सालापासुन ते २००० सालापर्यंत देवीच्या अनुभवाची प्रचिती भाविकांनी घेतली. इ.स. १६०७ रोजी बांधले गेलेले मंदीर साडेतीनशे वर्ष झाल्याने मोड़कळीस आले होते. त्या मंदिराचा जिर्णोद्धार लवकरात लवकर व्हावा या उद्देशाने गावक-यांनी एकदिलाने निर्णय घेतला. परंतु या मंदीराच्या बाजूला असणा-या आंब्याच्या वृक्षांची अडचण होत होती. गावक-यांनी तो वृक्ष तोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा श्री भगवान शंकरानी तेथे आपली प्रचिती नागाच्या रुपाने त्या वृक्षावर प्रकट होऊन दर्शविले. ज्याचे दर्शन आजही आपल्या नेत्रानी घेवु शकता.
देवीच्या परीसरात आढ़ळणारे दुर्मिळ वृक्ष
श्री केळंबादेवीच्या मंदीराच्या परिसरात पूर्वीप्रमानेही आजही केळीचे वन आपल्याला पहायला मिळतील. श्री एकवीरा आईच्या मंदिराच्या नजिक जसा नागुचाफा आहे. त्याचप्रमाणे श्री केळंबादेवीच्या मंदीराच्या नजिक चाफ्याचे वृक्ष आपल्याला पहावयास मिळेल. या परीसरात असणा- या बिल्व वृक्षावरून सिद्ध होते की, येथे भगवान शंकराच वास्तव्य आहे. साधारण दोनशे बिल्ववृक्ष या ठिकाणी होते. तसेच या परीसरात दुर्मिळ अशी रामवृक्षाची झाडे आपल्याला पहायला मिळतील
भाविकांची आलोट गर्दी
मागील अनेक वर्ष नवराञीच्या उत्सवात भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळते.दिवसेंदिवस देवीच्या उत्सवाचा महिमा वाढत गेल्याने नवसाला पावणारी जागृत माऊली म्हणून कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून भक्तांची संख्या वाढल्याने साधारणतः 10 ते 15लाख भाविक यावेळी दर्शनाला लाभ घेतात. येणा-या भाविकांसाठी मोफत प्रसाद भंडारा व चहापाण्याची सोय ग्रामस्थांनी केलेली पहावयास मिळते. या नवराञीच्या दिवसात मांसाहार व दारूबंदी कायमची बंदी असते .गावपंच ग्रामस्थ व ग्रामपंचायत एकदिलाने एकोप्याने व आनंदाने हा उत्सव साजरा करतात
संकटकाळी आई केळंबादेवीचे करा नामस्मरण
आई केळंबामाता तुमच्या मदतीला नक्कीच येईल धावून येईल यात शंकाच नाही .
Be First to Comment