सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔷🔶🔷
शिवसेना खांदा वसाहतीच्या वतीने शहरप्रमुख सदानंद शिर्के यांच्या नेतृत्वाखाली मोरे हॉस्पीटल ला भेट दिली व येथील सोसायटीच्या वतीने हॉस्पीटल संदर्भात काही तक्रार आल्या होत्या. या संदर्भात त्यांनी तेथील अधिकार्यांना जाब विचारला.
यावेळी शहरप्रमुख सदानंद शिर्के यांच्यासह उपशहरप्रमुख दत्तात्रेय महामुलकर, उपशहरसंघटक संजीव गमरे, उपविभागसंघटक शिवाजी बंडगर, शाखाप्रमुख से 5 सुनील औटी, शाखाप्रमुख से 6 सचिन धाडवे, शाखाप्रमुख से 9 पुंडलिक म्हात्रे, शाखाप्रमुख से 11 अतुल घुग तसेच उपशाखाप्रमुख दिपक चांदिवडे , शिवसैनिक संदिप तोरणे सर इ हजर होते.
यावेळी शहरप्रमुख सदानंद शिर्के यांनी हॉस्पीटल चे इन्चार्ज यांच्याशी व डॉ मोरे यांच्या शी फोनवरून चर्चा करून तात्पुरत्या स्वरूपात काही सुधारणा करण्यासाठी सांगितले व आज रात्री पर्यंत सोसायटीच्या वतीने काही सदस्य, डॉ मोरे व शिवसेना पदाधिकारी यांच्या सोबत बैठक लावून कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल याची सोसायटीच्या पदाधिकारी व सदस्य यांना आश्वासन दिले.
याप्रसंगी सर्व उपस्थित सोसायटीच्या सदस्यांनी शिवसेना आमच्या मदतीला धावून आली याबद्दल शिवसैनिकाचे आभार मानले.








Be First to Comment