Press "Enter" to skip to content

जाऊ दर्शनाला

जाऊ दर्शनाला

चला जाऊ वेहेरगावी, अंबा दर्शनाला,
हळदी कुंकू भरुनी तबकी करू पूजनाला ||१||

नऊ दिवस नऊ रात्र, अंबेचा सोहळा
खण ओटी घेऊन तबकी जाऊ दर्शनाला||२||

कुलाचीती आहे आई, पुजू
एकवीरेला
उंच डोंगर चढून पायऱ्या जाऊ दर्शनाला||३||

नऊदिवस नऊ माळा, मंडपी बाधिल्या
माथा ठेऊ चरणी तिच्या, घेऊ आशिषाला||४||

दसऱ्याला पुरणपोळी असे नैवेद्याला
सवाष्ण, ब्राह्मण, कुमारिका येती भोजनाला ||५||

अभिषेक करुनी पुजू दशमीला
नऊ वाती काकडाच्या,
मारू प्रदक्षिणा ||६||

दसऱ्याला काकडा गोंधळ
मागू या जोगवा
सीमोल्लंघन करुनि, साजीरा सोहळा||७||

पद्मनाभ प्रकाश भागवत, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.