रोह्यातील कोरोना बाधित रुग्णांची त्रिशतकाकडे वाटचाल
सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार )
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस रोहे तालुक्यात वाढू लागला असून,आज नव्याने ११ रुग्ण पाँझिटिव्ह सापडले आहेत.तर दोघांचा मृत्यू झाला आहे.या वाढत्या संख्येन रोहेे शहरासह ग्रामीण भागातील जनतेमध्ये भीती निर्माण झाली आहे.तर रूग्ण संख्या ही त्रिशतकाच्या आसपास पोहचून आजमितिस तालुक्यातील रूग्ण संख्या ही २९१ एवढी झाली आहे. औद्योगिक वसाहत लाभलेल्या रोहे तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने अक्षरशः थैमान घातले आहे.तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती प्रशासनाच्या हाताभाहेर गेल्याने जिल्ह्यात पुन्हा उद्या दि.१५ ते २४ जुलै पर्यंत कडकडीत लॉकडाऊन होणार असल्याची माहिती मिळाली आहे.रायगड सह रोह्यात कोरोनाचे सावट असल्याने दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे.या वाढत्या रुग्णांमुले नागरिकांच्या मनांत भीती निर्माण झाली आहे.तर घरीच रहा सुरक्षित रहा असे संदेश वारंवार प्रशासनाकडून देण्यात येत असल्याने अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त नागरिक बाहेर पडतांना दिसत नाही. तर आज तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार रोहे तालुक्यात आज नव्याने ११ रूग्ण सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्णसंख्या २९१ वर पोहोचली आहे.सध्या १०० रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत तालुक्यात 5 जण मयत झाले आहेत.यातील दोघांचा आज मृत्यू झाला आहे तर १८६ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले असले तरी नवे रुग्ण कोरोना बाधित होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालल्याने.ही बाब चिंतेची ठरत आहे






Be First to Comment