सिटी बेल लाइव्ह / खालापूर (बातमीदार)
तालुक्यातील धामणी गावातील नवनितलाल कारखान्याच्या आवारात पाच फूट लांबीचा नाग अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सर्प मित्र दिनेश ओसवाल व अमोल ठकेकर यांनी पकडल्यानंतर कामगारानी सुटकेचा निश्वास टाकला.कारखान्यात नागाचा वावर पाहून कामगार आणि सुरक्षा रक्षकाची दाणादाण उङाली. तात्काळ सर्पमिञांशी संपर्क साधण्यात आला. खबर मिळताच
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचेसर्प दिनेश ओसवाल आणि अमोल ठकेकर यांनी घटनास्थळी पोहचून अत्यंत सावधपणे पाच फूट लांबीचा पूर्ण वाढ झालेला नाग पकडला.नागाला सुरक्षित वनक्षेत्रात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमिञानी दिली .पावसाळ्यात सापांना पकडण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सर्प मित्रांशी संपर्क साधला जात असून नाग, अजगर, घोणस, मण्यार, धामण जातीच्या सापांची संख्या अधिक प्रमाणात असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.






Be First to Comment