Press "Enter" to skip to content

पनवेल मधील 15 आयुर्वेदिक वैद्यांच्या टीमला उपचार करण्यास पमपा ची परवानगी

पनवेल मधील कोविड रुग्णांच्या सुश्रुषेसाठी पनवेल मधील आयुर्वेद तज्ज्ञ सरसावले !

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

कोविड 19 च्या ह्या जनपदोध्वंस काळात पनवेल मधील कोरोना पॉझिटिव्ह अल्प व मध्यम स्वरूपाच्या लक्षणांचा प्रादुर्भाव असणाऱ्या रुग्णांना उपचार देण्यासाठी पनवेल मधील नामवंत 15 आयुर्वेदिक तज्ज्ञ , पनवेलच्या इतिहासातील सर्वात जुनी जाणती आयुर्वेदिक औषधांची कंपनी श्री धुतपापेश्वर व दवे आयुर्वेद भवन पुढे सरसावले असून आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे औषध आहार विहार ह्या त्रिसूत्री चा वापर करून आयुर्वेदिक उपचारानं कोविड 19 अनेक रुग्णांना फायदा होईल असा विश्वास आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाने कोविड चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयुष टास्कफोर्स ची स्थापना केली आहे ,सदर टास्कफोर्स मध्ये पनवेल मधील डॉ. अमित दवे सक्रिय सदस्य आहेत व ह्या टास्कफोर्स च्या माध्यमातून कोविड प्रतिबंधात्मक उपाय, अलक्षणिक व अल्प लाक्षणिक रुग्णांना वैकल्पिक आयुष उपचार देण्याची अधिसूचना काढली आहे (ऍड ऑन थेरपी). ह्या अधिसूचने नुसार आता पनवेल मधील 15 आयुर्वेदिक वैद्यांच्या टीमला इंडिया बुल्स व देवांशी इन येथील कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना शासनाच्या अधिसूचनेत समाविष्ट औषधांचे रुग्णाच्या संमतीने उपचार करण्यास पनवेल महानगरपालिकेने परवानगी दिली आहे.
सदर उपचारांसाठी लागणारी औषधे पनवेल मधील जुना व प्रसिद्ध कारखाना श्री धुतपापेश्वर लिमिटेड, पनवेल मधीलच आयुर्वेदाची परंपरा जपणारे दवे आयुर्वेद भवन ह्यांच्यामार्फत उपलब्ध केली जाणार आहेत. सदर चिकित्सा उपक्रमात डॉ सुभाष जैन, डॉ आशिष ठाकूर, डॉ सुमुख नाईक, डॉ समीक्षा नवरीकर, डॉ अमृता नाईक, डॉ अमित दवे, डॉ किरण कल्याणकर, डॉ गौरव दवे, डॉ संदीप राजपूत, डॉ कल्पेश खैरनार, डॉ आशिष म्हात्रे, डॉ ज्योती जोशी ,डॉ मंदार कर्वे ,डॉ सचिन शेठ, डॉ गावंड, डॉ. भालेराव,डॉ नीरज दांडेकर हे सर्व पनवेल परिसरातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ कोविड योद्धा म्हणून सहभागी आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.