Press "Enter" to skip to content

आजपासून जोझिला बोगद्याच्या कामाला सुरुवात.

आजपासून लडाखच्या कारगिल भागाला काश्मिर घाटीसोबत जोडणारा झोजिला बोगद्याच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. १४ किलोमीटर पेक्षा जास्त लांबीच्या या बोगद्याचे बांधकाम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पहिल्या विस्फोटाचे बटन दाबून सुरू होईल. हा आशियातील सर्वात लांब दुहेरी बोगदा मानला जातो.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील झोजिला बोगद्याच्या बांधकामाचा आज आरंभ होणार आहे. श्रीनगर खोरे आणि लेह दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवर सर्व हवामानात रस्ते संपर्क राखणं या बोगद्यामुळे शक्य होणार आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सर्वांगीण आर्थिक आणि सामाजिक-सांस्कृतिक समन्वय देखील यामुळे साधला जाणार आहे.

या बोगद्याची लांबी १४ किलोमीटरपेक्षा अधिक असून तो द्रास आणि कारगिलमधून श्रीगनर आणि लेह यांना तीन हजार मीटर्स उंचीवर जोडणार आहे. सध्या हा रस्ता वाहतुकीला सर्वात आव्हानात्मक असून भौगोलिक दृष्टीनं देखील अलिशय संवेदशील आहे.

या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लडाखची राजधानी लेह आणि जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर दरम्यान प्रवास करणे शक्य होणार आहे. हा प्रवास ३ तासांपेक्षा कमी असले. सध्या ११ हजार ५७८ फूट की उंचीवरील झोजिलामध्ये नोव्हेंबर आणि एप्रिलपर्यंत वर्षातील सहा महिने खूप बर्फवृष्टी होत असल्यामुळे एनएच-१ म्हणजेच श्रीनगर-कारगिल-लेह राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी बंद असते. दरम्यान वाहन चालवण्यासाठी हा जगातील सर्वात धोकादायक भाग म्हणून ओळखला जातो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.