सिटी बेल लाइव्ह । पनवेल । 🔷🔶🔷
चिंद्रण, कानपोली व वांगणीमधील MIDC प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आज प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील ह्यांची भेट घेतली. ह्यावेळी प्रकल्पग्रस्तानी श्री. बबनदादा पाटील ह्यांना “आमचा MIDC ला कोणताही विरोध नाही” असे सांगत प्रकल्पाला पाठिंबा दिला..

ह्यावेळी तीन गावातील प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष एकनाथ देशेकर, उपाध्यक्ष शिवाजीराव दुर्गे, अरुण देशेकर, शांताराम कुंभारकर, गणपत कडू, भगवान कडू, शंकर देशेकर, कल्पेश कडू, दिनेश पाडेकर, ज्ञानदेव पाडेकर, सुभाष दुर्गे, अनिल पाटील, एकनाथ मुंबईकर, विश्वनाथ ठाकूर आदी प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा नेते उपस्थित होते.







Be First to Comment