Press "Enter" to skip to content

मंगळवार १४ जुलै २०२०

आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल

🙏🏻सुप्रभात🌞
🌝🌻आज चे पंचांग🌚
🚩युगाब्द : ५१२२
🚩विक्रम संवत्सर : २०७७
🚩शालीवाहन संवत् :१९४२
🚩शिवशक : ३४७
🌞संवत्सर : शार्वरी नाम
🌅माह : आषाढ
🌓पक्ष तिथी : कृष्ण नवमी
🌝माह (अमावास्यांत): आषाढ
🌝माह (पौर्णीमांत) : श्रावण
🌸नक्षत्र : अश्विनी
🌳ऋतु : ग्रिष्म
🌳सौर ऋतु : वर्षा
🌏आयन: दक्षिणायन
🌞सुर्योदय: ०६:०७:२१
🌕सुर्यास्त: १९:१३:३३
🌤️दिनकाल: १३:०६:११
🌺वारः : मंगलवार
🌞 राष्ट्रीय सौर आषाढ २३
🌻१४ जुलै २०२०
📺 दिनविषेश
🚩आज केर पूजा आहे (त्रिपूरा)
🚩आज श्री गुरु हरकीशन जयंती आहे
🚩विश्व शतरंज संघ द्वारा श्री संदीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार प्राप्त २००३
🚩 डाकतार विभागाची १६० वर्ष जुनी सेवा बंद २०१३
💐 जन्म तिथी 💐
🚩महान समाजसेवक, केसरी वृत्तपत्राचे प्रथम संपादक श्री गोपाल गणेश आगरकर १९५६
🚩महानूभाव वाङमयाचे संशोधक श्री यशवंत खुशाल देशपांडे १८८४
🚩कवी, लेखक श्री गरीमेला सत्यनारायण १८९३
🚩संगीतकार श्री रोशनलाल नागरथ तथा रोशन १९१७
🌷 स्मृति दिन 🌷
🚩लेखक, विद्वान श्री धन गोपाल मुखर्जी १९३६
🚩योगी, अध्यात्मीक गुरु श्री स्वामी शिवानंद सरस्वती १९६३
🚩संगीतकार श्री मदनमोहन कोहली १९७५
🚩करवीर संस्थानाच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब १९९३
🚩अभिनेत्री श्रीमती लीला चिटणीस २००३
🚩राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचाल प्रा पु श्री राजेंद्रसिंह तथा रज्जूभैया २००३ **************

🌞 आज चे राशिफल 🌞
मंगळवार १४/०७/२०२०

🕉 राशी फल मेष
“निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. रोख रकमेची मोठी देवघेव टाळा. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल. ”

🕉 *राशी फल वृषभ*

प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील.

🕉 राशी फल मिथुन
आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता आहे. आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

🕉 *राशी फल कर्क*

व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा.

🕉 *राशी फल सिंह*

आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील. आरोग्य उत्तम राहील. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल.

🕉 *राशी फल कन्या*

अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शक्य आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल.

🕉 राशी फल तूळ
कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल.

🕉*राशी फल वृश्चिक*

वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

🕉 *राशी फल धनु*

आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल.

🕉 *राशी फल मकर*

इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी आहे. आपल्या सहकार्‍यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा.

🕉 *राशी फल कुंभ*

हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.

🕉 राशी फल मीन
आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. काही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.
चांगल्या व्यक्तीच्याच आयुष्यात
संकटाचा डोंगर नेहमी येत असतो
कारण, कदाचित त्याचा सामना करण्याची
क्षमता त्या व्यक्तीमध्ये असते..!

️🙏 सं.अजय शिवकर 🙏

*||शुभं भवतु ||*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.