सिटी बेल लाइव्ह । परभणी । 🔷🔶🔷
कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण देशात आताही मोठ्या प्रमाणावर कोरोनामुळे रुग्ण दगावत आहेत. देशात दररोज साधारणतः १ हजार लोकांचा कोरोनामुळे बळी जात आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली असून कोरोनामुळे महाराष्ट्रातील एका तरुण आयएएस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
२०१५ बॅचचे परभणीचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोविड मुळे निधन झाले आहे. सध्या ते त्रिपुरा राज्यात शिक्षण विभागात कार्यरत होते.
सुधाकर शिंदे यांचे उपचारादरम्यान पुण्यात निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय केवळ ३५ वर्षे होते.
सुधाकर शिंदे हे सध्या त्रिपुरा केडरचे अधिकारी होते, परंतु ते सुट्यांनिमीत्त १५ दिवसांपूर्वी कुटुंबियांसह गावी आले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर नांदेडमधील श्री गुरुगोविंदसिंगजी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यानंतर त्यांची परिस्थती खालावत गेली असता त्यांना पुढील उपचारासाठी औरंगबाद येथे दाखल करण्यात आले.
औरंगाबादवरुन त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले होते. रुबी रुग्णालयात आज (ता. ०९) त्यांची प्राणज्योत मालवली.
सुधाकर शिंदे हे त्रिपुरा राज्यात सहसचिव अर्थ मंत्रालय पदावर कार्यरत होते. त्यांचे शालेय शिक्षण परभणी येथील नवोदय विद्यालयात झाले होते. औरंगाबाद येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते स्पर्धा परिक्षांकडे वळले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन वर्षाची मुलगी असून त्यांच्या जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.








Be First to Comment