Press "Enter" to skip to content

भारतीय बौध्द महासभेच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी अनिल मोरे

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)

बुध्दिस्ट सोसायटी ऑॅफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी पोलादपूर येथील साप्ताहिक रायगड वैभवचे संपादक अनिल बाबू मोरे यांची निवड जाहीर झाली आहे. यावेळी म्हसळा येथील संतोष जाधव यांची सरचिटणीसपदी आणि माणगांव येथील विजय बा.जाधव यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. दक्षिण रायगड विभागात म्हसळा,श्रीवर्धन, महाड, माणगांव,रोहा, पोलादपूर, तळा या तालुक्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री भिकाजी कांबळे, विद्यमान अध्यक्ष यु.जी. बोराडे, रायगड जिल्हा दक्षिण विभागाचे पालकमंत्री सुशिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत ही निवड झाल्याचे बौध्द महासभेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष यु जी. बोराडे यांनी ऑॅनलाइन रायगड जिल्हा दक्षिण विभाग या विभागाच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर केली.

रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून समजल्या जाणाऱ्या पोलादपूर तालुक्याला दि बुध्दिस्ट सोसायटी ऑॅफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा यांच्यावतीने न्याय देण्यात आला असून अनिल मोरे यांची भारतीय बौध्दजन महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बौध्द महासभेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह अनिल मोरे यांच्या निकटवताअयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.