कंपनी मालकांसह प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिका-यांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । कळंबोली । प्रतिनिधी । 🔶🔷🔶
तळोजे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून सोडण्यात येणार्या अतिउग्र आणि दर्पयुक्त रसायनमिश्रित वायू प्रदुषणामुळे कोरोनापेक्षा भयंकर संकट आजार नागिकांना झाले आहेत, होत आहेत. संबंधित कारखान्यांवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. येेेथील प्रदुषणाला सर्वस्वी प्रदुषण नियंत्रण मंडळ व तळोजा औद्योगिक महामंडळ जबाबदारी असल्याचा आरोप पनवैल शहर पर्यावरण काँग्रेस अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केला आहे.
कोरोनाच्या महामारीचा कारखाना मालकांपासून सबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी फायदा घेत नागरिकांच्या जीवासी खेळ मांडला आहे सगळीकडे अँनलॉक करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारच्या अटी व शर्थींच्या आधीन राहून कारखाने चालू करण्यात आल्या. त्यानुसार तळोजे औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू आहेत. परंतु, दररोज रात्री घातक रसायनमिश्रित वायू कारखान्यांतून सोडला जात असल्याने त्याची तीव्रता हवेतील आद्रतेमध्ये मिसळून किमान 12 तास राहत आहे. त्यातून नागरिकांना श्वसनासह अनेक जीवघेणे विकार जडले आहेत.
सध्या कोरोनाचे भूत मानगुटीवर असल्याने साधा खोकला, शिंक जरी आली तरी कोरोनाने डंक मारला आहे की काय? अशी जीवघेणी शंका मनात फेर धरू लागते. त्या मानसिकतेमुळे कारखान्यांतून सोडण्यात येणारा घातक वायू मानवी जीवनाला धोक्याच्या वळणावर उभे करत आहे. तेजल केमिकल कंपनी व अन्य रसायनिक कंपन्यातून सोडण्यात येणार्या घातक वायूने कळंबोली, खारघर, खांदा काँलनी, रोडपाली, नावडे, तळोजा काँलनी रहिवासी हैराण आहेत. नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करून सुद्धा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकारी लक्षीच्या दर्शनाने नागरिकांचे जीव घेत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांंनी दिली.येथील प्रदुषणाला प्रदुषण नियंत्रण मंडळ व तळोजा औद्योगिक विकास महामंडळच जबाबदार असल्याचा आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे कारखाने नियम डावलून प्रदुषण निर्माण करीत असतील त्यांच्यावर तातडीने बंदीच्या कारवाईसह कायदेशिर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काही समाजिक संस्थाांकडून केली होती
येथील घातक वायू प्रदुषणानै नजिकच्या लोकांना दमा, क्षयरोग, छातीत जलजल या सारखे आजार जडले असून बालकांची वाढ खुंटणे, महिलांना वंधत्व येणे या आजाराने स्थानिक ग्रामस्थ हैराण आहेत. आज जर या दुखण्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले तर कदाचित कोरोनापेक्षा घातक वायूप्रदुषणामुळेच पनवेल, कामोठे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, खारघर, तळोजे आदी शहरांसह नजिकच्या गावांतील सरणं पेटतील, असा इशारा पनवेल शहर काँग्रेस पर्यावरण अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिला आहे.







Be First to Comment