सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔷🔶🔷
छात्रभारती विद्यार्थी संघटना नवी मुंबई व मैत्री ग्रूप पनवेलच्या माध्यमातून पनवेलमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला होता.
14 सप्टेंबर, 2020 रोजी भुलगढी, हाथरस, उत्तरप्रदेश येथे वाल्मिकी समाजातील दलित मुलीवर 4 नराधमांनी बलात्कार केला, तिची जीभ कापण्यात आली व तीला अमानुषपणे मारहाण केली. पिडीत मुलगी हॉस्पिटलमध्ये 15 दिवस मृत्यूशी झुंज देत राहीली त्यात तीला वेळेवर नीट उपचार न मिळाल्यामुळे 29 सप्टेंबर, 2020 रोजी तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घडलेल्या घटनेचा छात्रभारती विद्यार्थी संघटना नवी मुंबईने कँडल मार्च काढत, हातात निषेधाचे पोस्टर्स घेत तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला व मेणबत्ती पेटवून पिडीतेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच तहसीलदार कार्यालय पनवेल व पनवेल शहर पोलीस ठाणे येथे जावून आरोपींवर तत्काळ कायदेशीर कार्यवाही करत योग्य ती कठोर शिक्षा करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
यावेळी छात्रभारती नवी मुंबईचे अध्यक्ष अजय कांबळे तसेच संघटनेचे सहकारी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.











Be First to Comment