Press "Enter" to skip to content

काय आहे आज आपल्या राशीत वाचा आजचे भविष्य

🌞 आज चे राशिफल 🌞
गुरूवार ०८/१०/२०२०

🔴~~~🔴

🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )
( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)
नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिका
आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटू शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.

🕉 राशी फल वृषभ 🐂 ( TAURUS )
( जन्माक्षर – ई,उ,ए,ओ,वा,वी,वु,वे,वो)
नक्षत्र –🌞कृतिका,🌞रोहिणी(,🌞मृगशीर्ष
“आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल. अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. पैसा खर्च होईल.”

🕉 राशी फल मिथुन👫 ( GEMINI )
( जन्माक्षर -का,की,कु,घ,ङ,,छ,के,को,हा)
नक्षत्र 🌞मृगशीर्ष🌞आर्द्रा🌞पुनर्वसु
एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.

🕉 राशी फल कर्क ( CANCER )
( जन्माक्षर ही,हू,हे,हो,डा,डी डू,डे,डो,)
नक्षत्र 🌞पुनर्वसु🌞पुष्य🌞अश्लेषा
आज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील.

🕉 राशी फल सिंह( LEO )
( जन्माक्षर -मा,मी,मू,में,मो,टा,टी,टू,टे,)
नक्षत्र 🌞मघा🌞पूर्वा.फा.🌞उ.फाल्गुनी
आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील. आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल. कला क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. आपणास नवे वाहन मिळण्याची शक्यता आहे. मानसन्मानात वाढ होईल.

🕉 राशी फल कन्या 👩‍🦰 ( VIRGO )
( जन्माक्षर – टो,पा,पी,पू,ष,ण,ठ,पे,पो,)
नक्षत्र 🌞उ.फा🌞हस्त🌞चित्रा
आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे.

🕉 राशी फल तुला⚖️( LIBRA )
( जन्माक्षर – रा,री,रु,रे,रो,ता,ती,तू,ते,)
नक्षत्र 🌞चित्रा🌞स्वाती🌞विशाखा
आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्न वातावरण राहील. नवीन संधी मिळतील.

🕉 राशी फल वृश्चिक 🦂 ( SCORPIO )
( जन्माक्षर – तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यू,)
नक्षत्र 🌞विशाखा🌞अनुराधा🌞ज्येष्ठा
आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी आहे.

🕉 राशी फल धनु🏹 ( SAGITTARIUS )
( जन्माक्षर – ये,यो,भा,भी,भू,ध,फ,ढ,भे,)
नक्षत्र 🌞मूल🌞पूर्वा.आषाढ🌞उ.षा
एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र राहील.

🕉 राशी फल मकर 🐊 ( CAPRICORN )
( जन्माक्षर – भो,जा,जी,खी, खू,खे, खो,गा,गी,)
नक्षत्र —🌞उ.षा🌞श्रवण🌞धनिष्ठा
“चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. “

🕉 राशी फल कुंभ 🏺( AQUARIUS )
( जन्माक्षर – गु,गे,गो,सा,सी,सू,से,सो,दा,) नक्षत्र— 🌞धनिष्ठा🌞शततारका🌞पू.भाद्र
हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका. कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील.

🕉 राशी फल मीन 🦈 ( PISCES )
( जन्माक्षर – दी, दू,थ,झ,ञ,दे,दो,चा,फ,ची,)
नक्षत्र —-🌞पू.भाद्र🌞उ.भाद्रपद🌞रेवती
शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या.

“गर्वा शिवाय बोलणं,
हेतुशिवाय प्रेम करणं,
अपेक्षेशिवाय काळजी घेणं
आणि
स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे,
हे सर्व ख-या नात्याची लक्षणे आहेत.”

🙏 सं.अजय शिवकर 🙏

*||शुभं भवतु ||*

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.