Press "Enter" to skip to content

पेणमध्ये बंद अपयशी

महाराष्ट्र बंदला पेण मध्ये अल्प प्रतिसाद : महाविकास आघाडीच्या माध्यमातून पेण तहसिलदारांना निवेदन

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

उत्तर प्रदेशातील लखीमपुर-खीरी येथील शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्य सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पेणमध्ये अल्प प्रतिसाद मिळाला. शहरातील काही दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून गाडीखाली निष्पाप शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष मिश्रा यांना पाठीशी घालणा-या केंद्र सरकारचा निषेध
करण्यात आला.यावेळी पेण शहरातील मुख्य रस्त्यांवरून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढून सरकारच्या दडपशाही धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या या निषेध मोर्चाचे रूपांतर पेण येथील कोतवाल चौक येथे सभेमध्ये झाले.

यावेळी बोलतांना अनेक नेत्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्वरित मंत्री पदावरून बरखास्त करावे अशी मागणी करीत आज त्याठिकाणी शेतकऱ्यांना चिरडून मारले आहेत ते निंदनीय आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला सत्तेपासून खाली खेचल्या शिवाय ही जनता राहणार नाही असे सांगण्यात आले.

या मोर्चात काॅग्रेस शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, तालुकाध्यक्ष अशोक मोकल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत, माजी नगराध्यक्ष संतोष श्रृगांरपुरे, गंगाधर पाटील, शहर उपाध्यक्ष विशाल बाफणा, महिला अध्यक्षा सुचिता चव्हाण,
शिवसेनेचे तालुकापमुख अविनाश म्हात्रे पीआरपीचे जिल्हाध्यक्ष सिताराम कांबळे आदिंसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काॅग्रेस, पीआरपी,प्रहार संघटना आदिंसह इतर सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.