बारावीच्या वर्गातील अथर्व नाईक ने पटकावला नवी मुंबई विभागातून दुसरा क्रमांक
संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन
पनवेल / प्रतिनिधी.
नुकताच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( सी बी एस सी) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले. यामध्ये माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या डीएसपी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे बारावीच्या वर्गात शिकणारा अथर्व नाईक याने ९८% मार्क मिळवत नवी मुंबई विभागातून दुसरा येण्याचा सन्मान पटकावला आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. डी एस पी इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिल्या जाणाऱ्या अत्यंत उच्च दर्जाच्या शिक्षणामुळे येथील नेत्रदपक यशाची परंपरा याही वर्षी अबाधित राहिलेली आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार बाळाराम पाटील हे मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे यासाठी नेहमीच आग्रही असतात. १००% निकालाचे घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापिका विम्मी कपूर आणि समस्त शिक्षकवृंदाचे देखील अभिनंदन केले. १३ मे रोजी घोषित करण्यात आलेल्या सीबीएसई बोर्डाच्या निकालामध्ये दहावीच्या वर्गातून ९१.०२% मिळवत प्रथमेश शिर्के यांनी पहिला क्रमांक पटकावला तर दुसऱ्या क्रमांकावर श्रीराज शिर्के याला ९०.०६% गुण मिळाले.युवराज देसाई ८८.०४ % गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. बारावीच्या लागलेल्या निकालामध्ये अथर्व नाईक याने ९८% मार्क मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तसेच त्याने नवी मुंबई विभागातून दुसरा येण्याचा सन्मान पटकावला आहे.विदुषी राजहंस हिने ९५.०२% टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या सोमिल गुप्ता याने ९४.०६% गुण प्राप्त केले.
Be First to Comment