पनवेल / प्रतिनिधी
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल ठेवून वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय शिबिरे, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती केंद्रे आदी उपक्रम राबवण्यात आप्पासाहेबांचे मोलाचे योगदान आहे. तरुण पिढीला योग्य ते विचार देऊन त्यांना आयुष्याची योग्य दिशा देण्यासाठी संपूर्ण धर्माधिकारी कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिकेचे माजी.विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी अलिबाग येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. याप्रसंगी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.
Be First to Comment