Press "Enter" to skip to content

खा सुनिल तटकरे यांचा श्री साई सन्मानाने गौरव

श्री साई देवस्थान वहाळ ला भेट दिल्यावर शिर्डीत आल्या सारखे वाटतयं : खासदार सुनिल तटकरे

सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकुर ।

शिवजयंती चे औचित्य साधुन रायगड चे खासदार सुनिल तटकरे यांनी श्री साई देवस्थान साई नगर वहाळ येथील साई मंदीरा ला भेट दिली. यावेळी देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी त्यांचे उतस्फूर्त स्वागत केले.

यावेळी साई देवस्थान च्या वतीने खासदार सुनिल तटकरे यांना साई सन्माना ने गौरविण्यात आले. श्री साई देवस्थान वहाळ ला आल्या वर शिर्डी त आल्या सारखे वाटते असे गौरवोद्गार तटकरे यांनी यावेळी काढले.

यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, उरण विधान सभा अध्यक्षा भावना घाणेकर, पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, देवस्थान चे अध्यक्ष रवीशेठ पाटील, शिरिष कडू (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ़ उलवे नोड), अरुण दापोलकर, माजी प सदस्या सौ पार्वती ताई पाटील, जगन शेठ पाटील, डी के पाटील, सुयोग खरे, विश्वास पाटील, मो का मढ्वी, सचिन घरत (उप सरपंच गव्हाण ), वितेश म्हात्रे सदस्य ग्रामपंचायत वहाळ, निलेश म्हात्रे (माजी सेनिक ), सचिन मोरे, निलेश सोनवणे, अजय दापलोकर, श्रीकांत मुंबईकर आदीं सह साई भक्त उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.