Press "Enter" to skip to content

रायगड प्रेमींसाठी आनंदाची बातमी

किल्ले रायगड वर उभारणार दुसरा रोप वे……छत्रपती संभाजी राजेची मोठी घोषणा…. 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । 🔷🔷🔶🔶

रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगड वर जाण्यासाठी दुसरा रोप वे उभारण्याची घोषणा छत्रपती संभाजी महाराज यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये केली.

संभाजी राजे यांनी रायगड किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली. सध्या परिस्तितीत किल्ले रायगड वरील रोप वे हा वादाचा भोवऱ्यात सापडला आहे. मागील काही महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. रोपवे प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप संभाजी महाराज यांनी केला असून यापुढे असा मनमानी कारभार सहन केला जाणार नाही असा इशारा छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिला.

या वेळी रोप वे च्या जागेचा वाद मिटला नाही तर नव्याने प्राधारीकरणाच्या माध्यम्यातून दुसरा रोप वे बांधण्यात येईल असे सांगण्यात आले .

रायगड विकास प्राधिकरणाला संवर्धनाच्या कामासाठी जो निधी देण्यात येणार आहे त्यात नव्या रोपवेसाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या निधीतून किल्ले रायगडच्या स्वरूपाला साजेसा असा वैशिष्ट्यपूर्ण रोपवे उभारला जाईल, येत्या महिन्याभरात त्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात येईल असे खा. संभाजीराजे यांनी सांगितले.

बाईट –

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.