Press "Enter" to skip to content

काशिद-बिच समुद्रात बुडणाऱ्या चार जणांना जीवनदान

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 🔶🔶🔷🔷

मुरुड तालुकयामधील काशीद हे आंतराष्ट्रीय पर्यटन स्थळ असून येथे अनेक देशी -विदेशी पर्यटकांचा वावर असतो.मुरुड समुद्र किनाऱ्यापेक्षा सर्वात जास्त व मोठ्या संख्येने पर्यटक काशीद समुद्र किनारी येत असतात.

पुणे औरंगाबाद येथून मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात.व उत्साहापोटी समुद्रात पोहण्यास उतरतात व पाण्याचा अंदाज न आल्याने खोल समुद्रात खेचले जातात.आज सकाळीच पुणे येथील काही युवक पुण्याहून पर्यटनासाठी काशिद-बिचवर आले होते.काशीद येथील सुरुच्या वनात फिरता फिरता त्यांना समुद्रात पोहण्याचा मोह झाला.समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले चार जण पोहता पोहता खोल समुद्रात खेचले गेले व पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.तेथे उपस्थित जीवरक्षक याना सदरची बाब निदर्शनास आली.त्यांनी तातडीने त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या साहसाने पाण्यात उड्या घेतल्या.

चार युवकांना समुद्रात पोहताना बुडत असताना वाचविण्यात रोहन खोपकर,वॉटर स्पोर्टस व एडव्ह्चर्स चे लाईफगार्ड भावेश भोईर व संजय वाघमारे यांना मोठे यश प्राप्त झाले आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड टी.टी.एस.या नामांकित कंपनीतील इंजिनियर्स असलेले सत्यम कुमार (वय २१),सुमित बोरकर(वय२०),अनिरुद्ध गायकवाड(वय २०)नीरज कुमार(वय २४),पिरिसिल्ला गुप्ता(वय२१) व स्वाती लोणकर(वय १९) पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काशिद बिचवर आले होते.

यावेळी सत्यम कुमार, सुमित बोरकर, अनिरुद्ध गायकवाड व नीरज कुमार यांना समुद्रात पोहण्याचा मोह अनावर झाल्याने समुद्रात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. त्यांचे ओरडणे ऐकून लगेचच रोहन खोपकर वॉटर स्पोर्टस व एडव्हंचर्सचे लाईफगार्ड यांनी स्पीड बोटीच्या सहाय्याने चार युवकांचे प्राण वाचविले. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

या घटनेबाबत काशीद ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष राणे यांनी सांगितले कि तरुण वर्गाला समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही.किनाऱ्यालगत पोहणे खूप आवश्यक असताना उत्सहाच्या भरात खोल पाण्यात ओढले जातात.आज जीवरक्षक व स्पीड बोटीमुळे यांचे प्राण वाचवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.