Press "Enter" to skip to content

हाथरस मधील घटनेच्या निषेधार्थ पवईत तीव्र आंदोलन

सिटी बेल लाइव्ह । पवई । 🔷🔶🔷

एकीकडे देशभरात थैमान घालून ठेवून ठेवलेले कोरोना वायरस मुळे संपूर्ण देश त्रस्त असताना. उत्तरप्रदेश येथे हाथरस येथील वाल्मिकी समाजाच्या १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरून गेला आहे.

पिडीत तरुणीवर १४ सप्टेंबर रोजी समाजातीलच काही तरुणांनी वर सामूहिक बलात्कार करून तिची जिभ कापून टाकण्यात आली , तिचा मनका मोडण्यात आला. या घडलेल्या घटनेच्या तीव्र निषेध व्यक्त करत पवई आय.आय.टी मेनगेट येथे भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व आय.आय.टी संकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व नवी मुंबई घरकामगार महिला संघ पवई शाखा एकत्रित येऊन उत्तरप्रदेश सरकार व प्रशासन याबद्दल तीव्र निषेध करत घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

जस्टीस फॉर मनिषा वाल्मिकी !, मनिषाला न्याय मिळालाच पाहिजे !, योगी सरकार मुडदाबाद !अशा घोषणा देत मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत हे आंदोलन केले.

देशात वाढत चाललेल्या अन्याय अत्याचार घटनेला आळा बसण्यासाठी सर्वत्र सर्वानुपरी प्रयत्न चालू आहेत. तरीही निर्भया, खोपर्डी, आसिफा त्यानंतर आता मनिषा वालमिकी अशा घटना वारंवार समाजात घडत असल्याने समाजातील जनता तीव्र आक्रमक झाली असून ठिकठिकाणी आंदोलने मोर्चे काढून आपला निषेध व्यक्त करताना दिसत आहेत.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.