अॅड परेश देशमुख, अॅड मनोज धुमाळ समर्थकांसह शेकापक्षात
सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । धनंजय कवठेकर ।
चक्रीवादळाच्या संकटानंतर राज्य शासनाकडून बागायतदारांना किती नुकसान भरपाई मिळते आहे ते पाहू. झाडनिहाय मदत मिळायलाच पाहिजे, जर ती मिळाली नाही बायका मुलांना घेऊन रस्त्यावर उतरु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिला. शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने लॉकडाऊन आणि चक्रीवादळाच्या संकटाबाबत आढाव घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत यावेळी शेकापक्षाच्या ध्येय धोरणावर आणि विकासाच्या व्हिजनवर विश्वास ठेवत
भाजपामधून शेतकरी कामगार पक्षात स्वगृही परतणारे अॅड परेश देशमुख, तसेच भाजपात कार्यरत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अॅड मनोज धुमाळ यांनी आपल्या समर्थकांसह शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे आ. जयंत पाटील यांनी शेकापक्षात स्वागत केले.
यावेळी आमदार जयंत पाटील यांच्यासह माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, माजी जिप सदस्य संजय पाटील, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, तालुका चिटणीस अनिल पाटील, अनंतराव देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य चित्रा पाटील, प्रियदर्शनी पाटील, चेंढरे सरपंच स्वाती पाटील, सवाई पाटील, पंचायत समिती सदस्य रचना पाटील आदीं उपस्थित होते. या बैठकीत अनेक कुटूंबांना मदत करुन धिर देणार्या रोहा तालुक्यातील खैरेखूर्द येथील रोशनी एज्यूकेशन अॅन्ड वेलफेअर ट्रस्टचे शहाबुद्दीन धनसे यांचा आ. जयंत पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तसेच चक्रीवादळाच्या संकटातही आपण कुठेच दौरा न काढता आपले काम करीत अनेकांना मदतीचा हात दिला. पाच हजार विजेचे पोल मिळवून दिले. लागेल ती यंत्रणा उपलब्ध करुन दिली. राजकारण फक्त निवडणूकांपुरता करण्याचे आपले तत्व आहे त्याचेच पालन याकाळातही केले. ज्यावेळी माणूस अडचणी आहे त्याच्यावर अन्याय झाला आहे, त्याच्याविरुद्ध आपली लढण्याची आपली परंपरा आहे ती परंपरा आपण पाळण्याचे काम केले. पक्ष न बघता प्रत्येकाचे काम करण्याचा प्रयत्न केला. जो अडला, नडला अडचणीत आहे त्याला मदत करण्याचे काम शेकापक्षाचे आहे ते आपण केले. यावयात देखील मी तीन वेळा सागरगड माचीला गेलो. 99 टक्के लोेकांना मदत केली. या संकटामध्ये एक भुमीका घेऊन आपण काम केले पाहिजे. जो पर्यंत कोरोनाचे संकट संपत नाही चक्रीवादळाच्या संकटातून बाहेर पडत नाही तोपर्यंत राजकारण करायचे नाही, मतभेद ठेवायचे नाहीत ही शेकापक्षाची भुमीका आहे. भविष्यात कोरोनाचे संकट अधिक तीव्र होणार असून मोठया प्रमाणावर रुग्ण आढळण्याची शक्यता आहे त्याच्यापासून आपण सर्व नियमांचे पालन करुन सावध रहायला हवे असे आवाहनही यावेळी आमदार जयंत पाटील यांनी केले. उद्योगधंद्यात प्रचंड मंदीचे वातावरण दिसणार आहे. लेव्हला यायला उशिर लागणार असल्याने सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा.
यावेळी आ. जयंत पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता ज्यांना अधिकार आहेत तेच मदतीची मागणी करतात अशी टिका करताना हे चुकीचे असल्याचे सांगत ज्यांनी निर्णय घ्यायला हवा कोणाला किती मदत द्यायची याचे अधिकार आहेत त्यांनी सतत मागणी करणे कितपत योग्य आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. ज्यांना अधिकार आहे त्यांनी ते अधिकार वापरले पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी केली. झाडनिहाय आम्हाला मदत हवी आहे हेक्टरी मदत नको. एका झाडाचे चाळीस पन्नास रुपये, सुपारीचे पंचवीस रुपये देण्यापेक्षा आम्ही शासनाला पैसे देऊ. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्याच दौर्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितले की आम्हाला झाडनिहाय नुकसानभरपाई हवी आहे. त्यासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरु, आज रस्त्यावर आलो तर ते राजकीय होईल. त्यामुळे आम्ही शासनाला संधी देऊन पाहू. आज संपूर्ण अष्टागर नष्ट झाले आहे. चौल, रेवदंडा, नागाव, आक्षी या भागातील वाडया पडलेल्या आहेत त्या उभ्या करण्यासाठी आम्हाला दहा ते पंधरा वर्षे तरी लागतील असे आम्हाला वाटते आहे. आणि त्यांचे असलेले उत्पन्नदेखील गृहीत धरुन नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे. या सर्व गोष्टीचा पुर्ण विचार आपल्याला करायला हवा. जी घरे पडलेली आहेत आदिवासींना एक लाख देत होते ते दीड लाख आपण भांडून घेतले. आपल्याला ते दोन लाख मिळायला पाहिजे अशीही आपली मागणी आहे. त्यांची घरे देखील मातीचे न बांधता सिमेंट काँक्रीटची बांधून मिळाली पाहिजेत. अलिबागला राज्यशासनाने आजपर्यंत कधी काही दिले नाही. कुठल्याही संकटात आम्ही पैसे मागितले नाहीत. आम्ही अनेक दुष्काळात मदत केली. पुर आला आपण पैसे दिले. वादळ झाले कोकणाने मदत केली. आज पहिल्यांदा आपल्यावर एवढे मोठे संकट आले तेव्ही शासनाने आपल्याला भरभरुन मदत करायला हवी अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी यावेळी केली.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अॅड परेश देशमुख भाऊक झाले. आजचा दिवस आपल्या आयुष्याला नव्याने कलाटणी देणारा दिवस असल्याचे सांगतानाच लॉकडाऊनमध्ये घरी जायचा पास मिळाल्याचा जो आनंद होता तसाच आनंद मला आज स्वगृही परतताना होत आहे. या प्रवेशामुळे शेकापक्षाबद्दल कायम प्रेम निष्ठा असणार्या आपले वडिलांचे आयुष्य वाढल्याचे उद्गारही त्यांनी काढले. मी पक्ष सोडताना एकटाच गेलो होतो मात्र परत येताना तिकडचे कार्यकर्ते देखील मोठया संख्येने घेऊन आल्याचेही ते म्हणाले. यापुढे आम्ही एकत्रित काम करुन प्रत्येक निवडणूकीत पक्षाचे मताधिक्य वाढलेले दाखवू असा विश्वासही त्यांनी शेवटी दिला. तर अडॅ मनोज धुमाळ आपल्या मनोगतात म्हणाले जयंतभाईंच्या ध्येय धोरणावर आणि विकासाच्या व्हिजनवर विश्वास ठेवत आपण शेकापक्षात प्रवेश केला आहे. माझ्या आयुष्यातील पहिले मत मी शेकापक्षालाच दिले आहे. विकासाला शेकापक्षाशिवाय पर्याय नाही असे सांगताना पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
अॅड परेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र आंबेतकर, लीना आंबेतकर, अभिजीत सातमकर,लक्ष्मण पवार, विजय स्वामी, महेश पवार, सिध्देश म्हात्रे, सिध्देश चव्हाण, भुमित गाला, दिनेश शिरवडकर, सुयोग वेळे, अविनाश भालकर, हिमांशू भालकर, यश देशमुख यांनी शेकापक्षात प्रवेश घेतला. तर अॅड मनोज धुमाळ यांच्या सोबत पांडुरंग पाटील, सागर पाटील, नरेश पाटील, यांच्यासह श्री गणेश क्रीडा मंडळ दिवलांगचे पदाधिकारी तसेच सर्व सदस्यांमध्ये मंगेश पाटील, समिर म्हात्रे, मनिंदर पाटील , सुबोध म्हात्रे, प्रतिक धुमाळ, जयेंद्र म्हात्रे, प्रसाद म्हात्रे, निलेश लाड, सागर पाटील, रत्नदीप पाटील, संदीप धुमाळ, तृणाल म्हात्रे, साहिल धुमाळ, राकेश पाटील, शुभम धुमाळ, अमोल धुमाळ यांनी शेकापक्षात प्रवेश केला.
Be First to Comment