सिटी बेल लाइव्ह । मुंबई । अजय शिवकर । 🔶🔷🔶
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून परेलच्या केईएम रुग्णालय रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याचे उद्घाटन प्रमुख अतिथी नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केले .
उद्घाटनप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र ,मुंबई चे सेक्रेटरी डाँ पंकज भांडारकर ,तसेच मुंबईअध्यक्ष डाँ सुजातुनिसा अत्तार,आयोजक जीवनदाता सामाजिक संस्थाचे
अध्यक्ष गणेश आमडोसकर
विकास येवले, प्रशांत म्हात्रे
हितेश शृंगारपुरे, शशिकांत कुड,मनस्वी शिवलकर व इतर सभासद उपस्थित होते.
दोनच दिवसात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला व ९२बाटल्या रक्त जमा झाले.
संस्थेचे अध्यक्ष गणेश आमडोसकर यांनी सांगितले की,’कोविड१९ (कोरोना)’ मुळे रक्तदानाचे प्रमाण खूपच कमी आहे. रक्ताचा तुटवडा असल्याने अनेक रुग्णांना, विशेष करून थँलेसेमिया रुग्णांना रक्त मिळत नाही. हीच पोकळी भरून काढण्यासाठी जीवनदाता सामाजिक संस्थेने रक्तदानाचा कार्यक्रम रद्द न करता, कोविड योद्धे बनून न डगमगता, रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
हे रक्तदान शिबीर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करूनच घेण्यात आले
उदा. सुरक्षित अंतर, मास्क आवश्यक तसेच प्रत्येक रक्तदात्यांस फॉर्म भरण्यासाठी स्वतंत्र पेन व रक्तदान करताना वापरला जाणारा स्पंज बॉल हा नवीनच होता. सामाजिक बांधिलकी म्हणून काही पत्रकारांनीही रक्तदान केले.








Be First to Comment