सिटी बेल लाइव्ह / मुंबई : 🔶🔶🔷🔷
शिक्षा सुरक्षा फाऊंडेशन च्या ‘बिमा पाठशाळा’ या अभिनव ऍप चे लॉन्चिंग विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, उद्योग आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप पेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरिवली येथे करण्यात आले.
आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रेरणेने प्रत्येकाने विमा विषयात आत्मनिर्भर व्हावे अश्या हेतूने या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

अगदी छोट्या रकमेचे आणि गोरगरिबांना उपयुक्त असे विविध प्रकारचे विमा आणि त्याबद्दलचे ज्ञान या विमा पाठशाळेच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर, कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत कारुळकर, श्रीमती शीतल कारूळकर,भाजयुमो प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद उकावले, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष निलेश जी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment