ग्रामविकास विभागाच्या बैठकीत उपाययोजनांबाबत चर्चा 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशील सावंत) 🔶🔷🔷🔶
रायगड जिल्ह्यातील पाली व महड येथील अष्टविनायक क्षेत्राच्या विकास आराखड्याबाबत सोमवारी (दि. 28) ग्रामविकास विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अष्टविनायक क्षेत्रात पायाभूत सेवा व सुशोभीकरणाच्या दृष्टीने उपाय योजनांबाबत चर्चा करण्यात आली.

रायगड जिल्ह्यातील पाली व महड येथे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे पायाभूत सुविधा आणि सुशोभीकरण झाल्यास पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासाला चालना मिळू शकते. त्यामुळे ही बैठक महत्वपूर्ण आहे. या बैठकीला रायगड पालकमंत्री आदिती तटकरे पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक अशुतोष सलिल, संचालक दिलीप गावडे, कोकण विभाग कार्यकारी अभियंता विनय वावधने, ध्रुव कन्सलटेंसीचे संदीप जोशी व ग्रामविकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment