स्वत: हॅण्डपंप चालवून तहान भागविणारी आत्मनिर्भर म्हैस… पहा हा व्हिडिओ जरा हटके ! 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / नवी दिल्ली :
आपण अनेकवेळा माकड आणि मांजर स्वत: नळ सुरू करून पाणी पित असल्याचे किंवा वाया जात असणारं पाणी अडवत असल्याचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील इतकच काय अगदी लहानपणापासून तहानलेला कावळ्याची गोष्ट देखील ऐकली असेल. अशीच एक तहानलेली म्हैस आणि तिचं रेडकू पाण्याच्या शोधात फिरताना दिसले.
या म्हशीला जवळच हॅण्डपंप दिसला त्यातून हपाणी काढण्यासाठी ती प्रयत्न करू लागली. शिंगाच्या मदतीनं ती हॅण्डपंप वर-खाली करण्याच्या प्रयत्नात अखेर त्यातून पाणी आलं. रेडकू आणि म्हैस हे पाणी पिऊन तृप्त झाले. आपल्या बाळासाठी म्हशीनं हॅण्डपंपचा वापर करून पाणी काढलं आणि प्यायला दिलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
4 लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अक्कल मोठी की म्हैस असाही प्रश्न अनेक युझर्सनी विचारला आहे. माणसाची अक्कल तर हा व्हिडीओ तयार करण्यापूरती असल्याचं एका युझरनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तर दुसरा युझर म्हणतो माणसाची अक्कल जेव्हा चरायला जाते तेव्हा म्हैस मोठी असते. अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तहानलेला म्हैस कुणाचीही मदत न घेता स्वत: प्रयत्न करून तो हॅण्डपंप हलवून त्यातून पाणी काढते आणि ते आपल्या रेडकूसाठी देते आणि मन स्वत: पिते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आत्मनिर्भर म्हैस म्हणून हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Be First to Comment