Press "Enter" to skip to content

छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा साजरा

पुणे करार धिक्कार दिन कुणबी भवन,मुरबाड येथे संपन्न…! 🔷🔶🔶

सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनिल ठाकूर ) 🔶🔶🔷🔷

अखिल भारतीय ओबीसी महासभेच्या वतीने मुरबाड म्हसा रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा व पुणे करार धिक्कार दिवस या दिनांचे औचित्य साधून संघटनेचा पद नियुक्ती कार्यक्रम घेण्यात आला होता.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांचे स्वागत राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले लिखित शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक देऊन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ओबीसी महासभेचे कोकण विभागीय अध्यक्ष राजाराम ढोलम साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ रोजी पहिला राज्याभिषेक सोहळा झाला मग असं नेमकं काय कारण असावं की,छत्रपती शिवाजी महाराजांना दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ रोजी करावा लागला. यासंबंधी सर्वांनी मुद्देसुध्दा मांडणी केली.

त्यानंतर पुणे करार याविषयी मार्गदर्शन करताना अखिल भारतीय ओबीसी महासभेचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सुधाकर पाटील साहेबांनी सांगितले की,गांधीजींच्या इमोशनल ब्लॅक मेलिंगमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माघार घेऊन हा करार करावा लागला,‌त्यामुळे बहुजनातील ओबीसी,एससी,एसटी यांचे फार मोठे नुकसान कसे झाले आहे हे अगदी व्यवस्थित पटवून दिले.

या कार्यक्रमास पाहुणे म्हणून निर्मिक फाउंडेशनचे चेअरमन मा. राजेश पवार साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ला उत्तरप्रदेश मध्ये शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनातील ओबीसी प्रवर्गाविषयी केलेल्या भाषणातील संदर्भ देऊन असे सांगितले की एससी, एसटी व ओबीसी जर एकत्र आले तर या देशाचा इतिहास बदलण्यास वेळ लागणार नाही.तसेच १९४२ ला नागपूर येथे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनातील डॉ.बाबासाहेबांनी केलेल्या भाषणातील पुणे कराराचा बहुजनांवर काय परिणाम झाला.

याविषयी सविस्तर मार्गदर्शन आपल्या मनोगता मध्ये व्यक्त केले.तसेच अखिल भारतीय ओबीसी महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा.विजय पवार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.पुढे पद नियुक्ती मुरबाड जिल्हा महासचिव संजय जाधव,ठाणे जिल्हा मीडिया प्रभारी गुरुनाथ मारूती भोईर,मुरबाड तालुका उपाध्यक्ष भरत विलास शिंगोळे,मुरबाड तालुका महासचिव अनंता बाळसू घरत,मुरबाड तालुका महासचिव सचिन सदानंद फोडसे,मुरबाड तालुका उपाध्यक्ष जगदीश बंगार, मुरबाड तालुका उपाध्यक्ष किसन बुवाजी घुडे,मुरबाड तालुका मीडिया प्रभारी लक्ष्मण पवार,मुरबाड तालुका महिला सचिव सौ.गुलाब गोपाळ गायकर या सर्वांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

त्यानंतर अखिल भारतीय ओबीसी महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुंद चौधरी साहेबांनी संघटनेची ध्येय, उद्दीष्ट संदर्भात माहिती देऊन सर्वसामान्य जनतेतला प्रत्येक व्यक्तीने संघटनेत सामील व्हावे असे आवाहन केले.अखिल भारतीय ओबीसी महासभेचे ठाणे जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक व उपस्थितांचे यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय ओबीसी महासभेचे मुरबाड तालुक्याचे अध्यक्ष अनिलजी घुडे यांनी अथक परिश्रम घेतले.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.