सिटी बेल लाइव्ह / कांजुरमार्ग -(पंकजकुमार पाटील ) 🔶🔷🔷🔶
गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी कांजूरमार्ग (पूर्व) मध्ये नवमहाराष्ट्र व्यायाम शाळा येथे सकल मराठा आंदोलकांनी एकत्र येऊन आरक्षणासाठी मुक निदर्शने केली . या आंदोलनाच्या नेतृत्वासाठी भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबईचे कर्तृत्ववान खासदार श्री मनोज कोटक यांचे प्रतिनिधी म्हणून विक्रोळी विधानसभा महामंत्री श्री संजय नलावडे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
मराठा आरक्षणाला भारतीय जनता पार्टीचा सक्रीय पाठिंबा असल्यामुळे खासदारांच्या सूचनेनुसार नलावडे यांनी हे आमंत्रण स्वीकारून या आंदोलनात सहभाग घेतला .
यावेळी संजय नलावडे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उपस्थित मराठा आंदोलकांना संबोधित केले. तसेच त्यांच्याकडून आंदोलकांनी आरक्षणासंबंधी दिलेले निवेदन स्वीकारले गेले. या आंदोलनाच्या वेळी मराठा आंदोलकांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Be First to Comment