Press "Enter" to skip to content

मुंबई ची तुंबई होण्यावर पर्यावरण तज्ज्ञांची प्रतिक्रिया

सिटी बेल लाइव्ह / मुंबई 🔷🔶🔶🔷

काल संध्याकाळपासुन पडणाऱ्या पावसाने मुंबई पुन्हा बुडाली. मुंबईच्या सेंट्रलच्या नायर इस्पितळाचे छायाचित्र आणि मुंबई सेंट्रल नियोजित मेट्रो स्टेशनच्या भूयारातुन फेकले जाणारे पाणी व जवळील परिसराचा व्हिडीओ बोलका आहे.

तापमानवाढ आपला प्रताप हवामान बदलाच्या रूपाने दाखवत आहे. गोवा व कोकणात सप्टेंबरच्या उत्तरार्धात पडणारा तुफान पाऊस त्यामुळेच आहे. मोटारी आणि कोळशापासुन वीजनिर्मिती या दोन गोष्टी तापमानवाढीचे प्रमुख कारण असलेल्या कार्बन डाय ऑक्साईड वायूच्या जवळजवळ ८५ % उत्सर्जनास कारण आहेत. सागरी रस्ता आणि मेट्रो भूयारी रेल्वे प्रकल्प या दोन्ही कारणांस वाढवत आहेत. मुंबईच्या पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या व्यवस्थेची गृहिते कायमची मोडत आहेत.

( ग्रामीण शेतीवरील, अवकाळी, अतिवृष्टी, महापूर, उष्णतेच्या लाटा, घटते भूजल, घटते अन्नउत्पादन ही अरिष्टे हा याचाच भाग आहे.)

ही प्रलयंकारी बुडिताकडे होत असलेली वाटचाल आहे.
सागरी रस्ता व भूयारी रेल्वे हे दोन्ही समस्या वाढवणारे निरर्थक, विध्वंसक प्रकल्प ताबडतोब रद्द करण्याची गरज आहे. यात राजकारण आणू नये.
यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. नंतर पश्चात्ताप करून उपयोग नाही.

आपला
ॲड. गिरीश राऊत
निमंत्रक
भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
दू. ९८६९ ०२३ १२७

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.