सिटी बेल लाइव्ह / मुंबई 🔷🔶🔷🔶
कोरोना संकटकाळामध्ये मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी युरोपातील लस कोल्ड चेन उपकरण उद्योगातील अग्रगण्य बी -मेडिकल सिस्टिम या कंपनी तर्फे मुंबईतील नायर चॅरिटेबल हॉस्पिटलला कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी एक कोल्ड स्टोरेज आधुनिक उपकरण मोफत देण्यात येणार आहे.
उद्या शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बीवायएल नायर चॅरिटेबल हॉस्पिटलला हे उपकरण दिले जाणार असून यावेळी नायर हॉस्पिटलचे डीन डॉ रमेश भारमल, बी मेडिकल सिस्टिमचे डेप्युटी सीईओ जेसल दोषी तसेच महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बीवायएल नायर चॅरिटेबल हॉस्पिटल हे बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित असून देशभरातून इथे सर्वसामान्य नागरिक उपचारांसाठी येतात. एप्रिल २०२० मध्ये, नायर चॅरिटेबल हॉस्पिटलने कोरोना रुग्णांसाठी एकूण १०४३ बेड्ची सुविधा पुरवली असून आजपर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चने ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका तसेच भारतातील सिरम इन्स्टिटयूटने बनविलेल्या कोरोना लशीची पॅन-इंडिया क्लिनिकल चाचण्या घेण्यास नायर हॉस्पिटलला परवानगी दिली आहे.
कोव्हीड १९ च्या लसीकरणासाठी विविध चाचण्या नायर हॉस्पिटमध्ये केल्या जाणार आहेत व चाचण्यांचे नमुने व लस साठवून ठेवण्यासाठी अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजची गरज लागणार आहे कारण लस शोधण्याच्या व वापरण्याच्या प्रक्रियेत त्याचे तापमान हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांच्या संचयनास सतत रेफ्रिजरेशन आवश्यक असते, जर बनविलेल्या लशींची साठवण तापमानाच्या श्रेणीबाहेर ठेवली गेली तर ती लस कुचकामी आणि असुरक्षित ठरू शकते हा धोका टाळण्यासाठी जगातील अग्रगण्य कोल्ड चेन उपकरण बनविणाऱ्या बी- मेडिकल सिस्टमने मुंबईला मदतीचा हात देऊ केला आहे, गेली चार दशके ही कंपनी संशोधन झालेली लस टिकवून ठेवण्यासाठी शीतसाखळी उपकरणे बनवीत असून या उपयुक्त लसींची साठवण आणि वाहतुकीसाठी आधुनिक व नवीन उपायांवर संशोधन करीत आहे.






Be First to Comment