सिटी बेल लाइव्ह / उरण (घनश्याम कडू) 🔷🔶🔷🔶
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामध्ये तालुक्यातील भेंडखळ गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. भेंडखळ गावात कोरोनाने जवळपास १० पेक्षा जास्त मयत होऊन अनेकांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामध्ये एका घरातील तीन जणांचा समावेश आहे.यामुळे गावात कोरोनापासून आपले संरक्षण कशाप्रकारे करावयाचे याबाबत गावात मान्यवरांच्या उपस्थितीत जनजागृती करण्यात आली.
कोरोना ची टेस्ट लक्षणांच्या पहिल्यादिवशी करायला कोणताच जनरल प्रॅक्टीस करणारा डॉक्टर आणि पेशंट तयार होत नाही आणि ही फार मोठी चूक आहे. फ्लूचे थोडीफार लक्षण असलेले पेशंट मी काल पावसात भिजलो होतो, थंड पाणी पियालो होतो, मला हे पावसाळ्यात नेहमी होतं.
मला ऍलर्जी आहे, अशी अनेक कारणे देऊन तपासणी करण्याचे जाणूनबुजून
टाळतात. कोरोनाच्या अफवांमुळे नुकसान पेशंटचे होते. पेशंट ने टेस्ट केली नाही आणि किरकोळ औषधांनी तो बरा झाला तर त्याच नशीब चांगलं पण तो त्याच घरात अजुन २-३ लोकांना ते इन्फेक्शन देतो त्यात एक पेशंट तरी असा असतो जो नंतर सीरियस होता. पैसा आणि वेळ जातो कदाचित खूप उशीर केला तर जीवही. टेस्ट चुकीची आहे असे म्हणणारे खूपजण आहेत पण ज्याच्या घरी करोनामुळे कोणी जीव गमावला आहे. त्यांना आयुष्यभर पस्तावा राहणार की आपण लवकर टेस्ट केली असती तर त्याला वाचवू शकलो असतो.
पेशंट हा डॉक्टर नाहीये तो टेस्ट करायला मागेपुढे बघणार पण आज अजूनही खूप डॉक्टर पेशंटच्या टेस्ट पहिल्या ३ दिवसात करत नाहीत कारण पेशंट किरकोळ मेडिसिन ने बरा होईल, आपण टेस्ट करायला सांगितली तर तो दुसऱ्या डॉक्टरकडे जाईल, माझ्यावर नाराज होईल, अजुन पेशंटचां ऑक्सिजन चांगला आहे गरज काय, छातीचा X ray normal चांगला आहे अश्या कारणांमुळे प्रत्येक जनरल प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरला वाटते. ३ दिवसांनी बघू आजार वाढला तर टेस्ट करू असा विचार करून डॉक्टर मेडिसिन लिहून देतात. इथेच पेशंट च मोठं नुकसान होत. सिम्पटोमॅटिक उपचारामुळे त्याला थोड बर वाटत आणि तिसऱ्या दिवशी पेशंट टेस्ट करत नाही. हळू हळू फुफ्फुसात न्यूमोनिया वाढायला लागतो.
फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे सुरू होतात. ही प्रक्रिया एवढी स्लो असते की बऱ्याच वेळा ऑक्सिजन ९० च्या खाली गेला तरी त्याच्या लक्षात येत नाही आणि किरकोळ लागणाऱ्या दमामुळे तो थकवा आला असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. जेव्हा हा ऑक्सिजन ८८-८५ पर्यंत पोहचतो तेव्हा पेशंट त्रास व्हायला चालू होतो आणि तो पुन्हा त्या डॉक्टर कडे जातो तेव्हा दोघांच्या लक्षात येते खूप मोठी चूक झाली आणि आता ऍडमिट करण्याशिवाय पर्याय राहिलेला नसतो. खर्च, मनस्ताप आणि जीव या तीनही गोष्टी शेवटी नशिबाला येतात. हेच जर ऑक्सिजन ९२-९५ असता अडमिट केलं तर पेशंट ३ ते ४ दिवसात बरा होतो. तेही खूप कमी खर्चात पण तेच ८५-९० ला दाखल झाला तर ८ ते १२ दिवस लागतात आणि जीव जाण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पहिल्या ३ दिवसात RTPCR टेस्ट करा आणि पुढचे नुकसान टाळावे.
टेस्ट निगेटीव्ह आली म्हणून गाफील राहू नका आणि ऑक्सिजन कमी असेल तर फुफ्फुसाचा सिटी स्कॅन करून इन्फेक्शन तपासून घ्या आणि कन्फर्म करा. एवढ्या गोष्टी प्रत्येक जनरल प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टर ने पाळल्या तर महाराष्ट्राचा मृत्यू दर नक्कीच कमी होईल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच कोरोना पासून कोणकोणत्या उपाययोजना केल्यातर या आजारापासून आपण दूर राहू व कोरोना झाल्यानंतर काय करावयाचे याचीही माहीती यावेळी दिली.
यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मनोज भद्रे, डॉ. सत्या ठाकरे, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी संतोष पवार, प्रा. राजेंद्र मढवी, रुपेश पाटील, उपसरपंच लक्ष्मण ठाकूर, परशुराम भोईर, वैभव पाटील, पंकज ठाकूर आदी उपस्थित होते.
Be First to Comment