Press "Enter" to skip to content

वॉर्ड क्रमांक ११७ मध्ये भाजपच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा

विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व शैक्षिणिक साहित्य देऊन केला सत्कार 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / कांजुरमार्ग (पंकजकुमार पाटील )🔶🔷🔶🔷

भारतीय जनता पार्टी ११७ च्या वतीने खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाने तसेच विक्रोळी विधानसभा अध्यक्ष मंगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली कांजूरमार्ग वॉर्ड ११७ मधील के ई एम हायस्कुल , कांजुरमार्ग (पुर्व ) याठिकाणी १० आणि १२ वी मध्ये ८०% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी यावेळी या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन शैक्षिणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात के ई एम हायस्कुल व कमलाकर क्लासेसचे संचालक श्री कमलाकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे आयोजन रजनी रविंद्र कदम( ई. मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा) यांनी केले होते .

या कार्यक्रमास मंगेश सांगळे ( मा आमदार व मुंबई उपाध्यक्ष-भाजप), रविंद्र नारायण कदम( ई मुंबई जिल्हा उपाध्यक्ष), रमेश सिंग वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड क्र.१२०, प्रथमेश राणे वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड क्र.११८, वीरेंद्र महाडिक वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड क्र.११७, सुमित खामकर-(युवा मोर्चा विक्रोळी विधानसभा मंडळ अध्यक्ष),सौ प्रेरणा सरवणकर- (महिला वार्ड अध्यक्ष ११७) यांची विशेष उपस्थिती लाभली होती.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भाजपा वॉर्ड क्र.११७ चे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेऊन हातभार लावला.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.